शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

तेराव्याला तिलांजली, स्पर्धा परीक्षा अभ्यास केंद्रासाठी मदत

By admin | Updated: September 2, 2016 15:49 IST

पातुर तालुक्यातील मळसूर येथील देवकते कुटुंबियांनी मात्र तेरवीसारख्या रुढी, परंपरेला तिलांजली दिली असून त्यासाठी होणार खर्च स्पर्धा परिक्षा अभ्यास केंद्र उभारण्यासाठी देणार आहेत.

अतुल जयस्वाल
ऑनलाइन लोकमत
अकोला, दि. २ -  मनुष्य जन्मभर रुढी, परंपरा आणि कर्मकांडाच्या फेºयात अडकलेला असतो. ईहलोकाची यात्रा संपवल्यानंतरही त्याची या फेºयातून मुक्तता होत नाही. देह ठेवल्यानंतरही तेरवी, दसवा यासारख्या पारंपरिक विधीच्या जोखडातून मानसाची मुक्ती नाही. शेकडो वर्षापासून सुरु असलेल्या या परंपरा अजुनही सुरुच आहेत. पातुर तालुक्यातील मळसूर येथील देवकते कुटुंबियांनी मात्र तेरवीसारख्या रुढी, परंपरेला तिलांजली दिली आहे. वडीलांची तेरवी न करता त्यासाठी होणारा खर्च स्पर्धा परिक्षा अभ्यास केंद्र उभारण्यासाठी सत्कारणी लावण्याचा निर्णय घेऊन विठ्ठल देवकते यांनी  एक नवा पायंडा पाडला आहे.
मळसूर हे पातुर तालुक्यातील आडळणाचे एक गाव. अतिशय दुर्गम भागात असलेले या गावातील लोक जुन्या विचारांचे. या गावात शिकून मोठे झालेले मनपाचे सहायक माहिती अधिकारी विठ्ठलराव देवकते यांचे वडील संपतराव देवकते यांचे ३१ आॅगस्ट रोजी वृद्धापकाळाने वयाच्या ७८ व्या वर्षी निधन झाले. अंत्यविधीनंतर देवकते कुटुंबिय एकत्र बसले. व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर तेरवी, दसवा हे विधी ठरलेलेच. देवकते कुटुंबातील प्रमुख या नात्याने विठ्ठलराव देवकते यांनी वडींलाची तेरवी न करता तो खर्च स्पर्धा परिक्षा केंद्र उभारण्यासाठी सत्कारणी लावण्याचा निर्णय घेतला. त्यांनी हा निर्णय आप्त स्वकीयांना बोलून दाखविला. सर्व कुटुंबियांनी तो निर्णय मान्य केला. तेरवीसाठी साधारणपणे २५ ते ३० हजार रुपयांचा खर्च गृहित धरून त्या पैशातून गावातील विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परिक्षा अभ्यास केंद्र उभारण्यात येणार आहे. यासाठी सोपीनाथ संस्थानचे अध्यक्ष दिलीप काळे यांनीही मंदिराच्या परिसरात जागा उपलब्ध करून देण्याचा मानस व्यक्त केला. विठ्ठल देवकते हे युवाराष्ट्र या संघटनेशी जुळलेले आहेत. संघटनेचे धनंजय मिश्रा व इतर सदस्यांनी अभ्यास केंद्र उभारण्यासाठी मदत करणार असल्याचे सांगितले.
 
 अविनाश नाकट यांच्याकडून मिळाली प्रेरणा
पातुर तालुक्यातीलच तांदळी खुर्द येथील सामाजिक कार्यकर्ता अविनाश नाकट यांच्या पत्नी रुपाली नाकट यांचा पाच ते सहा महिन्यांपूर्वी दीर्घ आजाराने मृत्यू झाला होता. युवा राष्ट्र संघटनेशी जुळलेले व सामाजिक भान असलेल्या अविनाश नाकट यांनी रुढी, परंपरांचे जोखड झूगारुन पत्नीच्या तेरवीच्या खर्चाला फाटा देऊन गावातील शाळा डिजीटल केली होती. नाकट यांच्या समाजोपयोगी कार्याची प्रेरणा घेऊन विठ्ठल देवकते यांनीही वडीलांच्या तेरवीच्या खर्चातून स्पर्धा परिक्षा अभ्यास केंद्र उभारण्याचा निर्णय घेतला आहे.