श्रीनारायण तिवारी, मुंबईमहाराष्ट्रात सरकारी आणि निमसरकारी रुग्णालयांना दुय्यम दर्जाच्या औषधांचा पुरवठा करणाऱ्या कंपन्यांचे ‘गुजरात संबंध’ उघड झाले आहेत. या कंपन्यांपैकी सात कंपन्या गुजरातमधील असून, अन्य औषध कंपन्यांना सरकारी रुग्णालयांना औषधे पुरविण्याचे कंत्राट मिळवून देण्यातही गुजरातमधील व्यापाऱ्यांचा हात असल्याचे सूत्रांनी सांगितले़ राज्यातील सरकारी आणि निमसरकारी रुग्णालयांना पुरवठा झालेल्या औषधांपैकी ३३ औषधांचे नमुने चाचणीत फेल झाले आहेत. नमुने फेल झालेल्या ७ औषधांच्या उत्पादक कंपन्या गुजरातमधील आहेत. बनावट आणि दुय्यम दर्जाच्या औषधांविरुद्ध महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या कारवाई मोहिमेत राज्याच्या सरकारी रुग्णालयांतून तब्बल २२४ नमुने घेण्यात आले होते त्यातील २३ नमुने बाद झाले आहेत. यानंतर लगेचच अन्न आणि औषध प्रशासनाने त्या बॅचची सर्व औषधी नष्ट करण्याचा आदेश दिला होता; परंतु त्याआधी ही बाद करण्यात आलेली औषधे घेऊन किती रुग्णांच्या आयुष्याशी खेळ झाला, किती रुग्ण दगावले याची कोणतीही आकडेवारी सरकारी यंत्रणेकडे नाही.दुय्यम दर्जाच्या औषधांची आवक राज्यात वाढण्याची शंकाही बोलून दाखविली जात आहे. अन्न आणि औषध प्रशासनाकडील नोंदीनुसार दुय्यम दर्जाची म्हणून घोषित झालेल्या मलेरियावरील ‘लेविनेट आॅर्टेसुनेट इंजेक्शन’ ची उत्पादक कंपनी इप्का लॅबरोटरीज लिमिटेड अहमदाबादची आहे. याच प्रमाणे कंपाऊंड सोडियम लेक्टेट इंजेक्शन तयार करणारी डेनिस केम लॅब लिमिटेड ता. कलोल (गुजरात), ओमेप्रोजाल कॅप्सूल बनविणारी कंपनी ओसाका फार्मास्युटिकल्स प्रा. लिमिटेड, वडोदरा, रिलॅक्स कॅप्सूल व टॅबलेट बनविणारी कंपनी मर्क्युरी लॅबरोटरीज लिमिटेड, जारोड-वडोदरा, एम्प्लोडिपिन टॅबलेट व कॅप्सूल (एम्प्लोपिन-२.५) बनविणारी कंपनी सुनीज फार्मा प्रायव्हेट लिमिटेड-जी.आय.डी.सी. वातरा-अहमदाबाद, सोडियम क्लोराईड अँड डेक्स्ट्रोज इंजेक्शन बनविणारी कंपनी डेनिज केम लॅब लिमिटेड-कालोल-गुजरात, एमोक्सोलीन अँड पोटॅशियम क्लौवुनेट ओरल सस्पेंशन तयार करणारी कंपनी भारत पॅरेंटल्स लिमिटेड-परीपूर-वडोदरा येथील आहे.
राज्याला दुय्यम दर्जाच्या औषधांचा पुरवठा
By admin | Updated: December 1, 2014 02:29 IST