शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
4
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
5
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
6
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
7
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
8
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
9
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
10
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
11
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
12
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
13
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
14
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
15
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
16
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
17
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
18
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
19
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
20
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
Daily Top 2Weekly Top 5

एफआयआर टाळण्यास अधीक्षकांनीच सांगितले

By admin | Updated: November 29, 2015 02:35 IST

शीना बोरा हिचा मृतदेह २०१२ मध्ये आढळल्याचे माहिती असूनही रायगडचे तत्कालीन पोलीस अधीक्षक आर. डी. शिंदे यांनी आपल्याला प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) नोंदवून

-  डिप्पी वांकाणी,  मुंबईशीना बोरा हिचा मृतदेह २०१२ मध्ये आढळल्याचे माहिती असूनही रायगडचे तत्कालीन पोलीस अधीक्षक आर. डी. शिंदे यांनी आपल्याला प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) नोंदवून न घेण्यास सांगितले होते, अशी पोलीस निरीक्षक सुरेश मिरघे यांनी केंद्रीय गुप्तचर खात्याकडे (सीबीआय) दिलेल्या आपल्या निवेदनात दिली आहे. मिरघे यांनी निवेदनात शिंदेंनी केवळ स्टेशन डायरीत नोंद करून नमुने मुंबईतील जे.जे. हॉस्पिटलला रासायनिक आणि डीएनए विश्लेषणासाठी पाठविण्यास सांगितले होते, असे म्हटले. मिरघे यांच्या हस्ताक्षरात लिहिलेल्या पाच पानी निवेदनाची प्रत ‘लोकमत’ने मिळविली आहे. एकच नमुना जे. जे. हॉस्पिटल आणि कालिना येथील न्यायवैद्यक प्रयोगशाळेला पाठविण्याचे कारणे काय आहे, अशी विचारणा त्यांनी केली आहे. या प्रश्नांची उत्तरे माझे वरिष्ठ आणि ज्या डॉक्टरने शवविच्छेदन केले तेच देऊ शकतील, असेही त्यात म्हटले. पोलीस पाटील गणेश धेने यांनी सीबीआयला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की मी व्यासपीठाची सजावट करून परतत असताना झाडांवरील पडलेले आंबे गोळा करण्यासाठी गागोदे खेड्यात थांबलो असताना तेथे मृतदेह आढळला होता.धेने निवेदनात म्हणाले की,‘‘मी पोलीस चौकीला याची माहिती सकाळी ११ च्या सुमारास दिली. तेथे मला ही माहिती पोलीस नाईक व्ही. आर. भगत यांना देण्यास सांगण्यात आले. भगत यांनी चौकीचे प्रमुख एस. डी. मगर यांना कळविले. नंतर अधिकाऱ्यांनी पंचनामा केला व मृतदेह तेथेच पुरण्यात आला.पोलीस नाईक व्ही. आर. भगत यांनी त्यांच्या निवेदनात धेने यांनी मला माहिती दिल्याचे व मी ती मगर यांना कळविल्याचे म्हटले आहे. (मगर यांची त्या दिवशी साप्ताहिक सुटी होती). नंतर ते मृतदेह आढळला त्या ठिकाणी पोहोचले व निरीक्षक मिरघे आणि उपनिरीक्षक धांडे यांना कळविले. धांडेही त्या ठिकाणी पोहोचले. मी डॉक्टर ठाकूर यांच्याकडे मृतदेह सोपविला. त्यांनी अवशेष गोळा केले. २८ आॅगस्ट २०१५ रोजी मी मुंबई पोलिसांच्या तुकडीला मृतदेह पुरलेली जागा पुन्हा एकदा दाखविली. तुकडीने मृतदेह बाहेर काढला, असेही भगत त्यात म्हणतात. Þमगर माझ्याशी दूरध्वनीवर २३ मे २०१२ रोजी बोलले. पोलीस पाटील धेने यांना त्यांनी खापोली- पेण रस्त्यावरील गागोदे खिंड येथे जळालेली मुलगी आढळल्याचे सांगितले. पंचनामा व शवविच्छेदनासारख्या गोष्टी पूर्ण केल्या. मला त्यांनी फोन केला व तो सांगाडा असल्याचे सांगितले. मला पेण पोलीस ठाण्याच्या एका प्रकरणात (क्रमांक ३४/२०१०) खालापूरला जायचे होते व त्याच रस्त्यावर ते खेडे होते. मी पोलीस उपनिरीक्षक मेंगदळे आणि शिरकाळे यांच्यासोबत तेथे गेलो. तीच बाब मी फोनवर उपविभागीय पोलीस अधिकारी चव्हाण यांनाही कळविली.’’मिरघे आणखी म्हणाले की,‘‘चव्हाणदेखील काही वेळाने तेथे आले आणि आम्ही सगळ््यांनी त्या जागेची पाहणी केली. ज्या दिवशी मी त्या जागेला भेट दिली व मृतदेह बघितला ती जागा मी ओळखू शकतो. अगदी नखापासून ते केसांपर्यंत तो मृतदेह स्त्रीचा असल्याचे मला दिसले. तिच्या अंगावर एकही कपडा नव्हता. मी डॉक्टरांशी संपर्क साधला. चव्हाणदेखील माझ्यासोबत होते. मी दुसऱ्या प्रकरणाच्या चौकशीसाठी तेथून निघालो. मला शिंदे यांचा फोन आला. मी सांगड्याबद्दल सांगितले. मी माझ्याकडील चौकशी पूर्ण करून परतत असताना उपविभागीय पोलीस अधिकारी चव्हाण हे त्या जागी पंचनामा करताना दिसले. या प्रकरणात प्रथम माहिती अहवाल नोंदला गेलेला आहे की नाही हे शिंदेंना फोन करून विचारा, असे त्यांनी मला सांगितले. लगेचच एफआयआर नोंदवू नका असे शिंदेंनी सूचविले. तसेत करण्यास चव्हाण यांनी सांगितले.महत्त्वाच्या गोष्टीपोलीस पाटील झाडावरून जमिनीवर पडलेले पिकलेले आंबे गोळा करण्यासाठी थांबला असताना त्याला शीनाचा मृतदेह आढळला.मिरघेंनी चव्हाण यांच्या समोरच शिंदेंना माहिती दिली आणि शिंदेंनी त्यांना एफआयआर न नोंदवता केवळ स्टेशन डायरीत एन्ट्री करण्यास सांगितले.जे. जे. हॉस्पिटल आणि कालिना येथील न्यायवैद्यक प्रयोगशाळेत एकच नमुने पाठविण्यात आले. हाच प्रश्न मिरघेंनी आपल्या निवेदनात उपस्थित केला आहे.मिरघेंनी त्यांच्या पोलीस शिपायांनी प्रकरणाचा पाठपुरावा केल्याचे परंतु नंतरच्या तीन वर्षांत जे. जे. हॉस्पिटलकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याचे म्हटले.