शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

सुमनताई नाईक यांचे निधन

By admin | Updated: October 26, 2014 01:07 IST

माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या पत्नी सुमनताई सुधाकरराव नाईक यांचे हृदयविकाराने शुक्रवारी सायंकाळी 6.3क् वाजता पुसद येथे निधन झाले.

पुसद (जि. यवतमाळ) : जलसंधारणाचे प्रणोते माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या पत्नी सुमनताई सुधाकरराव नाईक यांचे हृदयविकाराने शुक्रवारी सायंकाळी 6.3क् वाजता पुसद येथे निधन झाले. त्या 8क् वर्षाच्या होत्या. शनिवारी गहुली येथील सुधाकरराव नाईक यांच्या समाधीनजीक शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत सुमनताई यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
सवरेदयी विचाराचा प्रभाव असलेल्या सुमनताई या बंजारा समाजातील जुन्या पिढीतील समाजसुधारक बळीराम पाटील (मांडवी) यांच्या कन्या होत्या. त्यांचे शिक्षण वर्धा येथे झाले. सुधाकरराव नाईक यांच्याशी त्यांचा विवाह 9 सप्टेंबर 1959 रोजी झाला होता. सुधाकरराव नाईक यांच्यामुळे त्यांना साहित्य व ललित कलेची गोडी लागली होती. 
गेल्या वर्षभरापासून त्या हृदयाच्या आजाराने पीडित होत्या. मुंबई येथील लिलावती व हिंदुजा हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार करण्यात आले. 
मात्र उपचाराचे सर्व मार्ग बंद झाल्यानंतर त्यांना पुसद येथील लाईफलाईन हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांच्या देखरेखीत ठेवण्यात आले.  शुक्रवारी सायंकाळी 6.3क् वाजता हृदयविकाराचे दोन तीव्र झटके आले आणि त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. 
त्यांचे पार्थिव पुसद येथील निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. त्यानंतर गहुली येथील सुधाकरराव नाईक 
यांच्या समाधीनजीक सुमनताई 
यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे 
मुलगा जनता शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष जय नाईक, अर्चना यशवंत चव्हाण, आराधना अशोक नाईक या दोन विवाहित कन्या आहे.  (वार्ताहर)
 
कुटुंबातील
ज्येष्ठ सदस्य हरविला
जलक्रांतीचे प्रणोते माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या सहधर्मचारिणी सुमनताई नाईक यांच्या निधनाने आमच्या कुटुंबातील ज्येष्ठ सदस्य हरविला. दर्डा आणि नाईक परिवाराचे ऋणानुबंध वर्षानुवर्षाचे आहेत. बाबूजी आणि वसंतराव नाईक साहेबांची घनिष्ठ मैत्री होती. सुधाकरराव हे बाबूजींना लहान भावासारखे होते. एकमेकांचे कुटुंब सुखदु:खात सोबत असायचे. सुमनताई यांच्या व्यक्तिमत्वाची ओळख याच ऋणानुबंधातून झाली. त्या कायमच्या आमच्या परिवारासाठी ज्येष्ठ सदस्य म्हणून होत्या. असे हे सोज्वळ व्यक्तिमत्व आमच्यातून कायमचे निघून गेले. ती कधीही भरुन न निघणारी हानी आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो. 
- विजय दर्डा, खासदार, चेअरमन लोकमत मीडिया प्रा.लि.