शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
4
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
5
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
7
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
8
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
9
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
10
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
11
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
12
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
13
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
14
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
15
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
16
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
17
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
18
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
19
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
20
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
Daily Top 2Weekly Top 5

कर्जबाजारी व नापिकीमुळे राज्यात चार शेतकऱ्यांच्या आत्महत्या

By admin | Updated: December 30, 2015 00:48 IST

कर्जबाजारीपणा आणि नापिकीमुळे सुरू असलेले शेतकऱ्यांचे आत्महत्यासत्र अद्यापही थांबलेले नाही. खान्देश आणि विदर्भातील चार शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे.

मुंबई : कर्जबाजारीपणा आणि नापिकीमुळे सुरू असलेले शेतकऱ्यांचे आत्महत्यासत्र अद्यापही थांबलेले नाही. खान्देश आणि विदर्भातील चार शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे.धुळे येथील शालीग्राम संतोष पाटील (४५) आणि वाळकी ता. चोपडा येथील अशोक गिरधर धनगर(नायदे) या शेतकऱ्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. शालिग्राम पाटील यांच्यावर खासगी सावकारी तसेच हातउसनवारीचे कर्ज होते. ते २६ डिसेंबरला सकाळी घरातून बाहेर निघून गेले होते. सोमवारी सांजोरी शिवारातील शेतात झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळून आला. तसेच अशोक धनगर यांच्यावरही खासगी सावकाराचे व पतसंस्था, सोसायटीच्या कर्जाला कंटाळून त्यांनी मंगळवारी दुपारी राहत्या घरी आत्महत्या केली.वर्धा जिल्ह्यामधील आष्टी येथील शेषराव पोकळे (६२) यांनी विहिरीत उडी घेऊन, तर चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यात पेंढरीजवळच्या केवडा येथील शुभम कापटे (२२) याने विष प्राशन करून आत्महत्या केली. अहमदपूर शिवारातील गुल्हाने याच्या शेतातील विहिरीत त्यांचा मृतदेहच आढळून आला. त्यांच्यावर बँकेचे एक लाखाचे कर्ज होते. तर शुभम याने विष प्राशन केल्यानंतर त्याला चंद्रपूरच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान, सोमवारी पहाटे त्याचे निधन झाले.(प्रतिनिधी)