शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
2
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
3
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
4
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
5
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
6
Latest Marathi News LIVE: होर्मुझ सामुद्रधुनीचा पेच, तणाव वाढला; ४० देशांची होणार बैठक, ब्रिटन-फ्रान्सने घेतला पुढाकार
7
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
8
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
9
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
10
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
11
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
12
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
13
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
14
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
15
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
16
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
17
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
18
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
19
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
20
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

एकाची आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या

By admin | Updated: June 23, 2016 19:31 IST

पिंपळगाव (ब.) येथील इसमाने येथून जवळच असलेल्या चिराई घाटात आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.

ऑनलाइन लोकमत,

सुरगाणा (नाशिक), दि. 23 - पिंपळगाव (ब.) येथील इसमाने येथून जवळच असलेल्या चिराई घाटात आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बाळू शिवाजी कडाळे (४०) रा.पिंपळगाव (ब.) ता.निफाड असे असून त्यांनी मानसिक तणावातून नैराश्यपोटी चिराई घाट परिसरातील आंब्याच्या झाडाला नायलॉन दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. बाळू कडाळे हे त्यांची मोटरसायकल घेऊन घरातून बाहेर निघून गेले होते. मात्र ते बराच उशिर होऊनही घरी परतले नव्हते. त्यामुळे गुरूवारी सकाळी त्यांचा शोध घेण्यासाठी मयत बाळू कडाळे यांची पत्नि सत्यभामाबाई व त्यांचा भाचा राजू मोरे (रा.सय्यदपिंप्री हे दोघेही सकाळी १० : १५) वाजेच्या सुमारास सुरगाण्याकडे येत असताना चिराई घाटात रस्त्यालगत कडाळे यांची निळ्या रंगाची डिस्कवर (दुचाकी क्र. एम एच १५ सी डब्ल्यु २४३१) हि दिसून आली.

त्यामुळे या दोघांनी चिराई परिसरात शोध घेतला असता एका शेता जवळील आंब्याच्या झाडाला बाळू कडाळे यांनी नायलॉन दोरीने गळफास घेतल्याचे दिसून आले. सदर घटनेची खबर चिराई येथील पोलिस पाटिल गोविंद धुळे यांनी पोलिसांना दिली. यावेळी पोलिस उपनिरिक्षक सचिन गवळी, पो.हवा. पारखे आदिंनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.