शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

दुकानात चोरी करणाऱ्याची आत्महत्या

By admin | Updated: February 13, 2017 03:37 IST

शहरातील एका दुकानात चोरी करणाऱ्या दोघांना साक्री पोलिसांनी शुक्रवारी रात्री पकडले. त्यांचा एक साथीदार पळून गेला होता.

साक्री (जि. धुळे) : शहरातील एका दुकानात चोरी करणाऱ्या दोघांना साक्री पोलिसांनी शुक्रवारी रात्री पकडले. त्यांचा एक साथीदार पळून गेला होता. त्याने पकडले जाण्याच्या भीतीने सटाणा गावानजीक एका पुलाखाली गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे शनिवारी उघडकीस आले.साक्री शहरात काही महिन्यांपासून दुकाने व टपऱ्या फोडीचे सत्र सुरू आहे. चोरटे पोलिसांच्या हाती लागत नव्हते. शुक्रवारी मध्यरात्री डी. आर. पाटील बॅँकेजवळील एका इलेक्ट्रीकल्स दुकानाच्या छताचा पत्रा उचकवून तीन चोरट्यांनी आत प्रवेश केला. दुकानातून त्यांनी ३५० रुपये चोरले. त्यानंतर ते बाहेर आले असता, त्यांच्या हालचाली पाहून पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला. त्यांचा माग काढत गढी भिलाटीतून पोलिसांनी गणेश शिंदे व दुसरा अल्पवयीन आरोपी याला ताब्यात घेतले. त्याचा साथीदार अविनाश पवार पळून गेला. त्याने एकाची मोटारसायकल चोरली आणि तो वेगाने निघून गेला. मात्र सटाणा गावाजवळच्या एका पुलाखाली त्याने गळफास घेत आत्महत्या केली. आत्महत्येच्या ठिकाणीच त्याने चोरी केलेली दुचाकी आढळून आली. (प्रतिनिधी)