शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

जवानाची सिमला येथे गोळी झाडून आत्महत्या

By admin | Updated: September 18, 2015 00:42 IST

अकोला जिल्ह्यातील सौंदळा येथील जवानाची आत्महत्या; आत्महत्येचे कारण अज्ञात.

अकोला : इंडो-तिबेट बॉर्डर पोलीस दलात सेवारत असलेल्या तेल्हारा तालुक्यातील सौंदळा येथील नितीन गजाननराव गोतमारे या २४ वर्षे वयाच्या जवानाने सिमला येथे मुख्यालयात १६ सप्टेंबरच्या रात्री बंदुकीतून स्वत:वर गोळी चालवून आत्महत्या केली. त्यांचे पार्थिव १८ सप्टेंबर रोजी सकाळी ७ वाजताच्या सुमारास विमानाने नागपूर येथे पोहोचणार आहे.दरम्यान,नितीनच्या आत्महत्येचे कारण मात्र समजू शकले नाही. सौंदळा येथील शेतकरी कुटुंबातील नितीनच्या वडिलांकडे तीन एकर शेती आहे. नितीनने बारावीपयर्ंत शिक्षण घेतल्यानंतर दोन वर्षापूर्वी तो इंडो-तिबेट बॉर्डर पोलीस दलात भरती झाला होता. त्याने बुधवारी रात्री १२ वाजताच्या सुमारास आयटीबीपीच्या सिमलास्थित तारादेवी मुख्यालयात बंदुकीतून स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. नितीनच्या आत्महत्येची बातमी सौंदळा येथे कळताच गावात शोककळा पसरली. गावातील व्यावसायिक व व्यापार्‍यांनी दुकाने बंद ठेवून कडकडीत बंद पाळला. त्याचे पार्थिव शुक्रवारी सकाळी विमानाने नागपूरला पोहोचल्यानंतर तेथून ते सौंदळा येथे आणले जाणार आहे. यासंदर्भात इंडो-तिबेट बॉर्डर पोलीसचे असिस्टंट कमांडर विक्रमसिंग यांनी आत्महत्येसंदर्भात सिमलामध्ये एफआयआर दाखल करण्यात आला असून, या आत्महत्येची चौकशी सुरू असल्याचे सांगीतले. या आत्महत्येचे कारण अद्यापपर्यंत समजू शकले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.