शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

विधी महाविद्यालयातील विद्यार्थिनीची प्रेमप्रकरणातून आत्महत्या

By admin | Updated: September 3, 2014 01:18 IST

अकोला येथील विद्यार्थिनीची प्रेमप्रकरणातून जाळून घेऊन आत्महत्या; युवकासह कुटुंबातील नऊ जणांवर गुन्हा दाखल.

अकोला: युवतीला लग्नाचे आमिष दाखवून तिचे लैंगिक शोषण करून, नंतर लग्नास नकार दिल्याने युवतीने जाळून घेतल्याची घटना सोमवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली. युवती ९८ टक्के जळाल्याने उशिरा रात्री तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. युवतीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी युवकासह नऊ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. युवतीच्या भावाने दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांची २५ वर्षीय बहीण शहरातील विधी महाविद्यालयात एलएलबी अंतिम वर्षाला शिकत होती. दीड ते दोन वर्षांंपासून तिचे जठारपेठेतील ज्योती नगरात राहणारा अमोल अशोक बेलसरे याच्यासोबत प्रेमसंबंध होते. अमोलने तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करून तिचे शोषण केले. दोघे पुण्याला जाऊन लग्न करणार होते; परंतु त्यांच्या लग्नाला अमोलचे आई-वडील व इतर नातेवाइकांचा विरोध होता. त्यानंतर हा वाद सामोपचाराने मिटवण्यात आला. कुटुंबीयांनीसुद्धा दोघांच्या लग्नास संमती दिली; परंतु पुढे पुन्हा वाद निर्माण झाला. आई-वडील व नातेवाइकांनी अमोलची समजूत काढून त्या युवतीसोबत लग्न न करण्यास त्यास बजावले. त्यामुळे आरोपी अमोल हा युवतीला टाळू लागला. तिने संपर्क करण्याचा प्रयत्न केला तर आरोपी अमोल, आई-वडील व त्याचे नातेवाईक युवतीचा शारीरिक व मानसिक छळ करू लागले. तिला धमक्या देऊ लागले. अखेर युवतीने या त्रासाला कंटाळून १ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास अंगावर रॉकेल ओतून स्वत:ला जाळून घेतले. यात युवती ९८ टक्के जळाली. तिला सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. सोमवारी दुपारी तिला खासगी रुग्णालयात हलविण्यात आले; परंतु रात्री तिचा मृत्यू झाला. युवतीच्या भावाच्या तक्रारीनुसार जुने शहर पोलिसांनी मंगळवारी सायंकाळी भादंवि कलम ३0६(३४) नुसार गुन्हा दाखल केला.

*या आरोपींवर गुन्हा दाखल जुने शहर पोलिसांनी ज्योती नगरातील अमोल बेलसरे, अशोक बेलसरे, शीला बेलसरे, पूजा बेलसरे यांच्यासह संतोष हुशे, सचिन मसने, सागर काळे, अक्षय लोखंडे, नीलेश नावकार, संतोष लोखंडे यांच्यावर गुन्हा दाखल केला.

*वकील होण्याचे स्वप्न अधुरेच.. युवती ही शहरातील एका विधी महाविद्यालयामध्ये एलएलबी अंतिम वर्षाला शिकत होती. पुढील वर्षी ती वकील होणार होती. वकील होण्याचे तिचे स्वप्न होते; परंतु आरोपींच्या छळामुळे तिचे स्वप्न धुळीस मिळाल्याचा आरोप तिच्या भावाने केला.