शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

जन्मठेपेच्या कैद्याची कारागृहात आत्महत्या

By admin | Updated: June 13, 2014 01:24 IST

पत्नीच्या खुनाच्या आरोपाखाली जन्मठेपेची शिक्षा भोगण्यासाठी आलेल्या तरूण कैद्याने गुरूवारी दुपारी येथील जिल्हा मध्यवर्ती कारागृहात गळफास घेऊन आत्महत्या केली. विशेष म्हणजे, कारागृह

पत्नीच्या खुनाचा होता आरोप : सहा दिवसांपूर्वीच आला होता चंद्रपूरच्या कारागृहातचंद्रपूर : पत्नीच्या खुनाच्या आरोपाखाली जन्मठेपेची शिक्षा भोगण्यासाठी आलेल्या तरूण कैद्याने गुरूवारी दुपारी येथील जिल्हा मध्यवर्ती कारागृहात गळफास घेऊन आत्महत्या केली. विशेष म्हणजे, कारागृह अधिक्षकांच्या केबिनलगतच त्याने ही आत्महत्या केल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे.मुकेश बिरबल रजाक असे या कैद्याचे नाव असून तो २७ वर्षे वयाचा होता. पत्नीच्या खुनाच्या आरोपाखाली येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने त्याला ७ जूनला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. तेव्हापासून त्याची रवानगी चंद्रपूरच्या जिल्हा मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली होती. वर्तणूक चांगली असल्याने त्याला कार्यालयातील कामाची जबाबदारी देण्यात आली होती, असे सूत्रांचे म्हणणे आहे. गुरूवारी दुपारी कारागृहातील बहुतेक शिपाई मध्यान्ह भोजनासाठी गेले असता शुकशुकाट बघून मुकेशने काळ्या रंगाच्या दुपट्याने गळफास तयार लावून आत्महत्या केली. दुपारी २.४५ वाजता कामावर परतलेल्या शिपायांना तो फासावर लटकलेला आढळला. मृत मुकेश हा मुळचा मध्यप्रदेशातील मुराना या गावचा असून येथील धारिवाल कंपनीमध्ये कामाला होता. वडगाव पोलीस चौकीमागे तो आपली पत्नी भुरी हिच्यासह राहात होता. त्याला चार, तीन आणि पाऊणे दोन वर्षांची तीन अपत्येही आहेत. २४ आॅगस्ट २०१२ रोजी त्याच्या पत्नीचा गळफास घेतल्याने मृत्यू झाला होता. या प्रकरणी मुकेश आणि घरकाम करणाऱ्या महिलेवर हत्येचा आरोप ठेवण्यात आला होता. यात अलिकडेच ७ जूनला येथील अतिरिक्त सत्र न्यायाधिश ए.एस. भैसारे यांच्या न्यायालयाने मुकेशला आरोपी ठरवून आजीवन कारावासाची शिक्षा सुनावली होती. तर सहआरोपी महिलेची निर्दोष मुक्तता केली. या गुन्हाची शिक्षा भोगण्यासाठी त्याला येथील जिल्हा कारागृहात ठेवण्यात आले होते.अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या निर्णयावर वरच्या न्यायालयात अपिल करण्यासाठी त्याचा भाऊ आणि अन्य नातेवाईक गेल्या दोन दिवसांपासून कागदपत्रांची जुळवावजुळव करीत होते. आवश्यक कागदपत्रे जमल्याचे सांगण्यासाठी दुपारनंतर त्याचा भाऊ कारागृहात भेटीसाठी गेला, मात्र तिथे त्याला मुकेशच्या आत्महत्येची वार्ता कळली. हे ऐकून त्यांना धक्काच बसला. घटना उघडकीस आल्यावर कारागृहाच्या वतीने शहर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली. त्यानंतर उपविभागीय अधिकारी संजय दैने, तहसिलदार गणेश शिंदे, पोलीस उपविभागीय अधिकारी राजू भुजबळ आदींनी घटनास्थळाला भेट देवून पाहणी केली. (जिल्हा प्रतिनिधी)