शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

छेडछाडीला कंटाळून युवतीची आत्महत्या

By admin | Updated: August 21, 2015 00:50 IST

एका तरुणाकडून सुरू असलेले सततचे अश्लील एसएमएस, फोन अन् धमक्यांनी त्रस्त होऊन विषारी गोळ्या घेऊन एका २३ वर्षीय मुलीने आत्महत्या केली

औरंगाबाद : एका तरुणाकडून सुरू असलेले सततचे अश्लील एसएमएस, फोन अन् धमक्यांनी त्रस्त होऊन विषारी गोळ्या घेऊन एका २३ वर्षीय मुलीने आत्महत्या केली. त्या तरुणाबरोबरच सिडको ठाण्याचे पोलीसही तिच्या मृत्यूला जबाबदार असल्याचे समोर आले आहे.अत्यंत शांत आणि हुशार असलेल्या श्रुती अशोक कुलकर्णी हिने आयटीआयमध्ये प्रवेश घेतला. तेथेच तिची ओळख स्वप्नील संतोष मिणियार (२३) याच्यासोबत झाली. आयटीआयमध्ये मन न रमल्याने तिने अकरावीसाठी एका महाविद्यालयात प्रवेश घेतला. मात्र, एकतर्फी प्रेमात पडलेला स्वप्नील सतत तिचा पाठलाग करू लागला. अनेकदा त्याने प्रेमाचा प्रस्तावही मांडला. मात्र, श्रुतीने त्याला प्रत्येकवेळी नकार दिला.तिने एमबीएसाठी प्रवेश घेतल्यानंतरही तो महाविद्यालयात जाऊन तिला अडवीत असे. सतत अश्लील फोन करणे, एसएमएस करणे असे प्रकार त्याने सुरू केले होते. ‘माझ्याशी लग्न कर, नाही तर तुला जगू देणार नाही, तुझ्या बहिणीला, आजी- आजोबांना जिवे मारीन,’ अशा धमक्या तो देत होता.सततच्या त्रासाला वैतागलेल्या श्रुतीने २४ जुलै रोजी सिडको पोलीस ठाणे गाठले आणि स्वप्नीलविरुद्ध अशी फिर्याद दिली होती.