शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
5
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
6
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
7
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
8
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
9
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
10
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
11
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
12
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
13
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
14
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
15
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
16
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
17
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
18
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
20
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

वीज वितरण कार्यालयात आत्महत्येचा प्रयत्न

By admin | Updated: September 5, 2015 01:26 IST

नादुरुस्त वीज रोहित्रामुळे शेतातील पिके पाण्याअभावी सुकत असताना वारंवार मागणी करूनही नवे रोहित्र बसविले जात नसल्याने तालुक्यातील एका शेतकऱ्याने वीज

कारंजा लाड (वाशिम) : नादुरुस्त वीज रोहित्रामुळे शेतातील पिके पाण्याअभावी सुकत असताना वारंवार मागणी करूनही नवे रोहित्र बसविले जात नसल्याने तालुक्यातील एका शेतकऱ्याने वीज वितरण कंपनीच्या कार्यालयातच विषप्राशन करण्याचा प्रयत्न केल्याची घटना गुरुवारी घडली. कारंजा तालुक्यातील खेर्डा (जिरापूरे) येथील शेतकऱ्यांनी उच्च क्षमतेचे नवीन रोहित्र बसविण्यासाठी कंपनीकडे २०१३मध्ये अर्ज केला होता. अतिरिक्त दाब येऊन या रोहित्रात वारंवार बिघाड येत होता. त्यामुळे वीजपुरवठ्याअभावी पिकांना पाणी देणे शेतकऱ्यांना शक्य होत नव्हते. हे रोहित्र बदलून नवे आणि अधिक क्षमतेचे रोहित्र बसविण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली होती; परंतु शेतकऱ्यांच्या या मागणीची दखल वीज वितरणच्या अधिकाऱ्यांकडून घेण्यात येत नव्हती.खेर्डा (जिरापुरे) येथील संतप्त शेतकऱ्यांनी गुरुवारी येथील वीज कंपनीच्या कार्यालयावर धडक दिली. यावेळी शेतकऱ्यांची कंपनीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा सुरू असतानाच संजय गागरे नामक शेतकऱ्याने विषारी औषध प्राशन करण्याचा प्रयत्न केला. इतर शेतकऱ्यांनी लगेच त्यांच्या हातातील विषारी औषधाची बाटली हिसकावून घेतली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. (प्रतिनिधी)