नागपूर : वर्गातील इतर मुलींजवळ नेटका गणवेश आहे, मात्र आपल्याकडे नाही या भावनेतून नागपुरातील रवीनगर येथे एका १२ वर्षीय मुलीने मंगळवारी सायंकाळी गळफास घेऊन आत्महत्या केली. रितू ढाकुलकर असे तिचे नाव असून सी. पी. अॅण्ड बेरार शाळेत ती आठवीत शिकत होती. रितूच्या वडिलांचा रवीनगर चौकात पानठेला आहे, तर आई धुणीभांडी करते. चार दिवसांपूर्वी रितूने वडिलांकडे गणवेश मागितला होता. वडील तिला दोन-चार दिवसांत गणवेश घेऊन देणार होते. शिक्षकांनाही कळवले होते. ही गोष्ट तिच्या मनाला लागली असावी व तिने आत्महत्या केली असावी, असे पालकांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)
नवीन गणवेश न मिळाल्याने आत्महत्या
By admin | Updated: July 14, 2016 04:03 IST