शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईतील युगुलाचा कोल्हापुरात आत्महत्येचा प्रयत्न

By admin | Updated: February 23, 2016 00:55 IST

हातकणंगले रेल्वे फाटकाजवळ असणाऱ्या राम मंदिरसमोरील पान टपरीमागे वसई-विरार येथील सोनी मनीष नीळकंठ (३४) आणि अरुण प्रल्हाद नाईक (३६) या दोघांनी विषारी औषध

हातकणंगले (जि. कोल्हापूर) : हातकणंगले रेल्वे फाटकाजवळ असणाऱ्या राम मंदिरसमोरील पान टपरीमागे वसई-विरार येथील सोनी मनीष नीळकंठ (३४) आणि अरुण प्रल्हाद नाईक (३६) या दोघांनी विषारी औषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. यात पे्रयसी सोनी नीळकंठ हिचा मृत्यू झाला; तर अरुण याची प्रकृती गंभीर असून, त्याच्यावर सीपीआरमध्ये उपचार सुरू आहेत. या घटनेची नोंद हातकणंगले पोलीस ठाण्यात झाली आहे.पोलीस ठाण्यातून मिळालेली अधिक माहिती अशी, वसई-विरार येथून जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात अरुण प्रल्हाद नाईक आणि सोनी मनीष नीळकंठ हे बेपत्ता झाले होते. सोमवारी पहाटे हातकणंगले येथील इचलकरंजी रस्त्यावरील रेल्वे फाटकाजवळ राम मंदिरासमोरील पान टपरीमागे हे युगुल बेशुद्ध अवस्थेत पडल्याचे मॉर्निंगवॉकला आलेल्यांना दिसले. त्यांनी ही माहिती हातकणंगले पोलिसांना दिली. दोघेही बेशुद्ध असल्यामुळे पोलिसांना त्यांचा पत्ता शोधणे अवघड होते. दोघांच्या शेजारी एक मोबाइल, पाण्याची बाटली आणि नॅपकीन पडला होता. मोबाइलमधील सीमकार्ड फेकून दिले होते. मात्र, हँडसेटमधील नंबरवरून या दोघांचा पत्ता शोधून पोलिसांनी त्याच्या नातेवाइकांशी संपर्क साधला. तरुणी विवाहित असून, तिला १३ वर्षांचा मुलगा आहे. (प्रतिनिधी)