शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

साखरखेर्डा लालफितमध्ये पडून

By admin | Updated: June 12, 2014 22:18 IST

साखरखेर्डा तालुका निर्मितीचा प्रश्न महाराष्ट्र विधानसभेत लालफीतमध्ये पडून आहे.

सिंदखेडराजा: गत २४ वर्षापासून साखरखेर्डा तालुका निर्मितीचा प्रश्न महाराष्ट्र विधानसभेत लालफीतमध्ये पडून आहे. तो प्रश्न आज नविन जिल्हे आणि तालुके होत असतांना मांडणे गरजेचे आहे. यासाठी आ.डॉ.राजेंद्र शिंगणे काय भूमिका घेतात, याकडे सर्वसामान्य जनतेच्या नजरा लागल्या आहेत. साखरखेर्डा तालुका निर्मिती क्षेत्रात संभाव्य ८५ गावाचा समावेश असून, चार जिल्हा परिषद सर्कलचे अंतर २५ की.मी.चे आत आहे. यात सिंदखेडराजा तालुक्यातील ३६, लोणार तालुक्यातील ५, मेहकर तालुक्यातील २५ आणि चिखली तालुक्यातील काही गावांचा समावेश आहे. सिंदखेडराजा मतदार संघात जी गावे आहेत; परंतु तालुके बाहेरच्या मतदार संघातील आहेत. अशी सर्व नावे साखरखेर्डा गावाशी संलग्न असून, ती सर्व गावे संभाव्य तालुक्याशी निगडीत आहेत.साखरखेर्डा गावची लोकसंख्या २0 हजार असून येथे ३ इंग्रजी माध्यमाच्या शाळा, स्व.भास्करराव शिंगणे कला महाविद्यालय, वाणिज्य महाविद्यालय, विज्ञान महाविद्यालय, चार माध्यमिक विद्यालय, तीन खासगी प्राथमिक शाळा, जि.प. प्राथमिक शाळा मराठी, कन्या आणि उर्दू शाळा आहेत. सहकार महर्षी स्व.भास्करराव शिंगणे यांची वैभवशाली सुतगिरणी, व्यापारी बाजारपेठ येथे असून, पाच बँकाही आहेत. दररोज हजारो लोकांची वर्दळ येथे असते. साखरखेर्डा गाव सिंदखेडराजा तालुक्यात असून, सिंदखेडराजा आणि बुलडाण्याचे अंतर सारखेच आहे. भौगोलीक दृष्ट्या सिंदखेडराजा तालुका अयोग्य असून कोठेच कशाचा मेळ नाही. मेहकर येथून १५ कि.मी. अंतरावर असलेले शेवगा जहाँगीर हे गाव ७५ की.मी. अंतरावर असलेल्या सिंदखेडराजा तालुक्यात आहे. असे विचित्र भौगोलीक क्षेत्रफळ या तालुक्याचे आहे. तत्कालीन मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या समोर या अगोदर प्रश्न मांडण्यात आला होता. तत्कालीन महसुल मंत्री छगनराव भुजबळ यांनी कृती आराखडा सुद्धा मागविला होता. त्यात वसंतराव मगर, स्व.आप्पासाहेब देशमुख, स्व.सखाराम हाडे, स्व.प्रा.डी.एन.गवई, स्व. भगवानराव पाटील, भाऊसाहेब सावजी, माजी सरपंच शे.युसूफ कुरेशी, रविंद्र पाटील, राम जाधव, चंद्रशेखर शुक्ल, साहेबराव काटे, बाबुराव मोरे, आदी मंडळी तालुका मागणीसाठी पुढे सरसावली होती.त्यानंतर तालुका कृती समितीचे अध्यक्षपद डॉ.राजेंद्र शिंगणे यांना देवून संपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर टाकण्यात आली होती. साखरखेर्डा तालुका निर्मितीची तब्बल २0 वर्षात फक्त जनतेतून मागणी होत होती. परंतु राजकीय पटलावर कधीच आली नाही. तालुका निर्मिती झाल्यास विकासाचे अनेक प्रश्न मार्गी लागणार आहे. यामुळे साखरखेर्डा तालुका व्हावा, या मागणीसाठी तेजराव देशमुख, मदनशेठ जैस्वाल, दामुअण्णा शिंगणे, शिवदास रिंढे, रमेश गवई, सुनिल जगताप, राजेंद्र तळेकर, भोजराज गाडेकर यांनी वेळोवेळी उपोषणे केली आणि मागणीत जीवंतपणा ठेवला. सर्वसामान्य जनतेचा जिव्हाळ्याचा, अस्मीतेचा प्रश्न म्हणून विधानसभेत प्रश्न लावून धरावा आणि मागणीचे सार्थक करावे, हीच जनतेची अपेक्षा आहे.