शहरं
Join us  
Trending Stories
1
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
2
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
3
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
4
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
5
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
6
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
7
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
8
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
9
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
10
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
11
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
12
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
13
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
14
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
15
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
16
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
17
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
18
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
19
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
20
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागातील महिलांनी केली २३ कोटींच्या कर्जाची यशस्वी परतफेड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2016 08:43 IST

नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील महिलांनी अतिशय प्रामाणिकपणे बँकांच्या २३ कोटी रुपयांच्या कर्जाची यशस्वीरीत्या परतफेड केली

ऑनलाइन लोकमत

नागपूर, दि. १ -  धनधांडग्यांकडून बँकेचे कर्जरुपात घेतलेले पैसे बुडविण्याचे प्रकार घडत असताना, नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील महिलांनी अतिशय प्रामाणिकपणे बँकांच्या २३ कोटी रुपयांच्या कर्जाची यशस्वीरीत्या परतफेड केली. ग्रामीण विकास यंत्रणेच्या पाठबळामुळे जिल्ह्यातील महिला बचतगटांना आत्मनिर्भर करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या कर्जातून त्यांनी आपल्या व्यवसायाला बळकट करीत, बचतगटांच्या खात्यात लाखो रुपयांची सेव्हिंग केले. शासनाच्या सहकार्यामुळे ग्रामीण भागातील महिलाही आता उद्योगाच्या प्रवाहात आल्या आहेत. ग्रामीण भागातील महिलांची आर्थिक व सामाजिक प्रगती साधण्यासाठी शासनाच्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून महिला बचत गटांना पाठबळ मिळाल्याने नागपूर जिल्ह्यातील शेकडो महिला बचत गट उद्योगाच्या प्रवाहात आले आहे. यातील काही महिला बचतगटांची वार्षिक उलाढाल दहा लाखावर पोहचली आहे. लोणचे, पापड, तिखट, मसाले या वस्तूंना मागे टाकून बचत गटांनी सॅनिटरी नॅपकीन, मत्स्यपालन, फुलशेती यातही आपले पाय रोवले आहे. गेल्यावर्षी जिल्ह्यात बचत गटांनी २३ कोटी रुपयांचे कर्जाची यशस्वीरीत्या परतफेड केली आहे. बचत गटांचे यश लक्षात घेता यावर्षी शासनाने ३१.७४ कोटी रुपयांचे महिला बचत गटांना कर्ज उपलब्ध करून देण्याचे टार्गेट जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेला दिले आहे. महिला बचत गट ही केवळ योजना नसून महिला सबलीकरण, सक्षमीकरण आणि सशक्तीकरणाची एक सुप्त क्रांतिकारी चळवळ आहे. बचत गटांमुळे महिलांमध्ये संघटनशक्ती, स्वविकास व सामाजिक विकासाची जाणीव निर्माण झाली आहे. जिल्ह्यात १८६४ महिला बचत गट आहे. बचत गटाच्या माध्यमातून मायक्रो बँकिंग मोठ्या प्रमाणात सुरू केले आहे. कौटुंबिक गरजा, अडीअडचणी सोडविण्याकरिता बचत गटाच्या माध्यमातून कर्जपुरवठा करण्यात येतो. परंतु काही बचत गटांना ग्रामीण विकास यंत्रणेने दिलेल्या प्रोत्साहनामुळे हे बचतगट व्यवसायाकडे वळले आहेत. - केवळ पैशांची बचत करणे एवढेच बचत गटाचे उद्दिष्ट नसून त्यांच्या हातांना काम मिळवून देणे आणि स्वयंरोजगार करण्याची प्रेरणा मिळावी हा त्यामागचा उद्देश आहे. ग्रामीण विकास यंत्रणेचे त्यांना पाठबळ मिळाल्यामुळे या महिला आपले कर्तृत्व सिद्ध करीत आहेत. मकरंद नेटके, प्रकल्प अधिकारी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा