शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांना पैसे नव्हे, पुस्तकेच मिळणार

By admin | Updated: March 10, 2017 00:53 IST

विद्यार्थ्यांना यापुढे विनामूल्य पाठ्यपुस्तकांऐवजी अनुदानाचे पैसेच दिले जातील, असा निर्णय शिक्षण विभागाने घेतला होता. मात्र, अवघ्या दोन महिन्यांतच या निर्णयाचा फेरविचार

- अविनाश साबापुरे,  यवतमाळविद्यार्थ्यांना यापुढे विनामूल्य पाठ्यपुस्तकांऐवजी अनुदानाचे पैसेच दिले जातील, असा निर्णय शिक्षण विभागाने घेतला होता. मात्र, अवघ्या दोन महिन्यांतच या निर्णयाचा फेरविचार करण्याची वेळ शासनावर आली आहे. इतक्या कमी कालावधीत प्रत्येक विद्यार्थ्याचे बँक खाते काढणे आणि ते आधारशी जोडणे शक्य नसल्याची उपरती अधिकाऱ्यांना झाली असून यंदाही विद्यार्थ्यांना शाळेतूनच विनामूल्य पाठ्यपुस्तके दिली जाणार आहेत.केंद्राच्या धोरणानुसार महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण परिषदेने विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके देण्याऐवजी, तेवढी रक्कम विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात (डीबीटी) टाकण्याचा निर्णय घेतला होता. २०१७-१८ या शैक्षणिक सत्रात विद्यार्थ्यांना पुस्तकाऐवजी पैसे मिळणार होते. त्यादृष्टीने दोन महिन्यांत प्रत्येक विद्यार्थ्याचे राष्ट्रीयकृत बँक खाते काढून, ते आधारशी जोडण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, अजूनही विद्यार्थ्यांची बँक खाती उघडण्याचे काम पूर्ण झालेले नाही. अनेक विद्यार्थ्यांची आधार नोंदणीही झाली नसल्याने हे काम २०१८-१९ या सत्रात होणार आहे.‘एसएमएस’ आला, पत्रही येणारआधार आणि बँक खात्यांचे काम पूर्ण न झाल्याने यंदा विद्यार्थ्यांना डीबीटीऐवजी पाठ्यपुस्तके दिली जाणार आहेत. त्यामुळे आपल्या जिल्ह्यातील पाठ्यपुस्तकांची मागणी तयार ठेवा. येत्या चार-पाच दिवसांत अधिकृत पत्र मिळेल, असा एसएमएस वरिष्ठ पातळीवरून शिक्षण विभागातील एका अधिकाऱ्याला प्राप्त झाल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले.