शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

अकारावीत प्रवेश न मिळाल्यामुळे विद्यार्थीनीची आत्महत्या

By admin | Updated: July 25, 2016 17:54 IST

दहावीच्या परिक्षेत कमी गुण मिळाले त्यामुळे अकारावीत प्रवेश मिळत नसल्याने शिक्षणापासून वंचित रहावे लागणार या नैराश्येपोटी घाटनांद्रा ता. मेहकर येथील एका विद्यार्थीनीने विहीरीत

ऑनलाइन लोकमतबुलढिाणा  : दहावीच्या परिक्षेत कमी गुण मिळाले त्यामुळे  अकारावीत प्रवेश मिळत नसल्याने शिक्षणापासून वंचित रहावे लागणार या नैराश्येपोटी घाटनांद्रा ता. मेहकर येथील एका विद्यार्थीनीने विहीरीत उडी घेवून आत्महत्या केल्याची घटना घडली.  कु.जया विजय राठोड असे या विद्यार्थीनीेचे नाव आहे. 

मेहकर तालुक्यातील घाटनांद्रा येथील विजय राठोड यांची मुलगी कु. जया विजय राठोड ही खामगाव येथील न्यु.ईरा हायस्कुलमध्ये शिक्षण घेत होती. यावर्षी ती दहावी पास झाली. मात्र दहावीमध्ये तीला जेमतेम ४५ टक्केच गुण मिळाले. कमी गुण मिळाले तरी तीने पुढील शिक्षण घेण्याची ईच्छा वडिलाजवळ व्यक्त केली.

  मुलगी किमान १२ वी पर्यंत शिकावी अशी वडिलांची सुध्दा ईच्छा होती. म्हणून विजय राठोड यांनी तीला अकरावीमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. मात्र प्रत्येक ठिकाणी त्यांना अपयश आले. कोणत्याच कॉलेजला प्रवेश मिळत नव्हाता, अनेक महाविद्यालयाचे उबंरठे राठोड यांनी झीजवूनही त्यांना यश मिळाले नाही. काही कॉलेजवर प्रवेश पाहिजे असेल तर डोनेशन लागेल, असे सांगण्यात आले मात्र प्रवेशाससाठी पैसे भरण्याची त्यांची ऐपत नसल्याने आपणाला शिक्षणापासून वंचित रहावे लागणार या नैराश्यापोटी जया हीने २५ जूलैच्या सकाळी घरातील सर्व मंडळी झोपलेली असल्याचे पाहून ती घराशेजारील विहीरीवर गेली, व तीने विहीरीत उडी घेवून आत्महत्या केली.

. ही बाब सकाळी उघडकीस आली. प्रवेशासाठी डोनेशन भरू शकत नसल्याने जया राठोड हिने आत्महत्या केल्याच्या या घटनेमुळे परिसरात हळ हळव्यक्त होत आहे.गरीबीमुळे पुन्हा एका सावित्रीचा अंतएसटी बसची पास काढण्यासाठी वडिलाकडे पैसे नसल्यामुळे मागील वर्षी एका विद्यार्थीनीने आत्महत्या केली होती. अशीच काहीशी घाटनांद्रा येथील ही घटना असून मृतक जया राठोड हिचे वडिल अल्पभुधारक आहेत. मागील दोन वर्षापासून नापिकीमुळे शेतीत माल होत नाही. मागील वर्षी पेरणीसाठी काढलेले बँकेचे ५० हजार रूपये कर्ज कायम आहे. अशातच यावर्षी सुध्दा पेरणीसाठी उसनवारी करावी लागली. त्यामुळे मुलांच्या शिक्षणासाठी पैसे नसल्यामुळे विजय राठोड यांनी मुलीच्या शिक्षणाला पुर्णविराम द्यावा लागला होता. मुलींच्या शिक्षणावर शासन कोट्यावधी रूपये खर्च करते. तरीही गरीबी व दारिद्र्यामुळे अनेक मुली शिक्षणापासून वंचित राहत आहेत. याच गरीबी व दारिद्र्यामुळे आज पुन्हा एका सावित्रीला आपली जीवनयात्रा संपवावी लागली