शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांची तारांबळ

By admin | Updated: August 11, 2014 23:07 IST

ऑनलाईन प्रक्रिया खोळंबली : अर्ज भरण्याची अंतीम मुदत १६ ऑगस्ट

मेहकर: शिष्यवृत्ती अर्ज ऑनलाईन पद्धतीने शाळा व महाविद्यालयांमधुन विद्यार्थ्यांंना भरावा लागतो मात्र विद्यार्थ्यांना सदर अर्ज भरण्यासाठी बाहेरील ई-संकेतस्थळ केंद्रावर पाठविले जात आहे. ही ऑनलाईन पद्धत विस्कळीत झाल्याने सध्या विद्यार्थ्यांंची तारांबळ उडत आहे. समाजकल्याण विभागाच्यावतीने अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांंसाठी शिष्यवृत्तीची महत्त्वाकांक्षी योजना लागू करण्यात आलेली आहे. सन २0१३-१४ या शैक्षणिक वर्षात राज्यभरातून १७ लाख ४५ हजार ४४९ विद्यार्थ्यांंनी शिष्यवृत्तीसाठी अर्ज भरले होते. तर सन २0१४-१५ या शैक्षणिक वर्षात शिष्यवृत्तीसाठी अर्ज भरणे ऑनलाईन सुरू असून, अर्ज भरण्याची अंतीम मुदत १६ ऑगस्ट आहे. सदरचे अर्ज संबंधीत शाळेच्या मुख्याध्यापकांनी शिष्यवृत्तीच्या संकेत स्थळावरून भरून गटशिक्षणाधिकार्‍यांकडे जमा करण्याचे शासनाचे आदेश आहेत. शाळेतच शिष्यवृत्तीचे अर्ज भरून देण्याच्या सूचना समाज कल्याण विभागाकडून वारंवार देण्यात येतात. मात्र, महाविद्यालय आणि शाळांकडून याकडे दुर्लक्ष होत असून, विद्यार्थ्यांंना बाहेरील ई-संकेतस्थळावरून शिष्यवृत्ती अर्ज भरण्यास पाठविले जात आहे. त्यामुळे शिष्यवृत्ती अर्जामध्ये बर्‍याच त्रुट्या निघत असल्याची प्राथमिक माहिती आहे. अर्जातील चुकांमुळे विद्यार्थ्यांंना शिष्यवृत्तीपासून वंचीतही राहावे लागू शकते. दरम्यान शिष्यवृत्ती अर्ज भरण्याची ऑनलाईन सेवा गत दोन दिवसांपासून विस्कळीत झाली असून, अर्ज भरण्याची अंतीम मुदत जवळ येत आहे. त्यामुळे अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांंसह पालकांचीही तारांबळ उडत आहे. ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया तत्काळ सुरळीत झाली नाही, तर शिष्यवृत्तीपासून बरेच विद्यार्थी वंचित राहण्याची भिती परिसरात निर्माण झाली आहे.** शिष्यवृत्ती अर्ज भरण्यास अवाजवी शुल्क विद्यार्थ्यांंचे शिष्यवृत्तीचे अर्ज आपल्या शाळा, महाविद्यालयातूनच भरावे असे आदेश समाज कल्याण विभागाकडून सर्व शाळा, महाविद्यालयांना देण्यात आले आहेत. परंतु, काही शिक्षक समाज कल्याणच्या या आदेशाची अमंलबजावणी न करता विद्यार्थ्यांंना अर्ज भरण्यासाठी बाहेरील ई-संकेतस्थळावर पाठवित आहेत. तेथे विद्यार्थ्यांंकडून शिष्यवृत्ती अर्ज भरण्यासाठी प्रति ४0 ते ५0 रूपये असे अवाजवी शुल्क आकारले जात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांंना नाहक भुर्दंंंड बसत आहे.