शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

‘लोकमत’च्या संस्काराचे मोती उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद

By admin | Updated: June 29, 2017 11:46 IST

मुलांसाठी मनोरंजनातून हसतखेळत ज्ञानाचा खजिना खुला व्हावा या हेतूने दै. ‘लोकमत’मध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘संस्कारांचे मोती’ हे विशेष पान प्रसिद्ध होत आहे.

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 29 -  जागतिकीकरणाच्या आजच्या युगात स्वत:चे अस्तित्व सिद्ध करायचे असेल तर मुलांना शैक्षणिक गुणवत्तेच्या स्पर्धत सहभागी व्हावेच लागणार. चांगले गुण मिळवण्यासाठी अथक परिश्रमपूर्वक अभ्यास करावाच लागणार. पण या अभ्यासासोबतच मुलांचे मनोरंजन व्हावे आणि याच मनोरंजनातून हसतखेळत ज्ञानाचा खजिना त्यांच्यापुढे खुला व्हावा या हेतूने दै. ‘लोकमत’मध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘संस्कारांचे मोती’ हे विशेष पान प्रसिद्ध होत आहे.

२७ जूनपासून सुरू झालेल्या या विशेष पानात सामान्य ज्ञान, खेळ, जगातील स्मार्ट शहरांची माहिती, भाषा ज्ञान वाढवणारे कोडे, अभ्यासासाठी उपयुक्त आॅनलाईन साईट्सची माहिती असे बरेच काही आहे. त्यामुळेच या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. विद्यार्थ्यांकडून मिळणारा हा उत्स्फूर्त प्रतिसाद लक्षात घेता आता या उपक्रमाअंतर्गत स्पर्धेचे आयोजन करून हवाई सफर, प्रमाणपत्र यासह आकर्षक बक्षीसे जिंकण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळणार आहे.

इयत्ता दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी ही स्पर्धा विनामूल्य आहे. दै. लोकमतमध्ये ‘संस्काराचे मोती’ या विशेष पानामध्ये प्रसिद्ध होणारी कुपन्स कापून त्याची चिकटवही तयार करून विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी होऊ शकतात.  १ जुलै ते १० आॅक्टोबर २०१७ असा या स्पर्धेचा कालावधी आहे. या कालावधीत दै. ‘लोकमत’मध्ये ‘संस्काराचे मोती’ या पानावर रोज एक कूपन देण्यात येईल.

दुसरी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी हे कूपन कापून शाळांमधून वाटप करण्यात येणाऱ्या किंवा दै. ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या प्रवेशिकेतील चौकटीत चिकटवायचे आहे. प्रथम क्रमांकाच्या विजेत्या स्पर्धकाला रिमोट कंट्रोल ट्रान्सफॉर्मर कार, दुसऱ्या विजेत्यास सॅक तर तृतीय क्रमांकाच्या विजयी स्पर्धकाला लंच बॉक्स देण्यात येईल. याशिवाय जिल्हानिहाय एका विद्यार्थ्यास हवाई सफरीची संधी मिळणार आहे. सोबतच उत्तेजनार्थ बक्षीसे व स्पर्धेत सहभागी प्रत्येक स्पर्धकाला विशेष प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येईल.