शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
4
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
5
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
6
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
7
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
8
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
9
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
10
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
11
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
12
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
13
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
14
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
15
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
16
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
17
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
18
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
19
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
20
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेची ‘खाऊसेना’ म्हणून खिल्ली

By admin | Updated: February 13, 2017 04:08 IST

महानगरपालिकेच्या निवडणुकांची रणधुमाळी आता चांगलीच रंगली आहे. त्यात जाहीर सभांमध्ये होणाऱ्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरींनीही जोर धरला

स्नेहा मोरे / मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांची रणधुमाळी आता चांगलीच रंगली आहे. त्यात जाहीर सभांमध्ये होणाऱ्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरींनीही जोर धरला आहे. भाजपा समर्थकांनी सोशल मीडियाच्या प्रचार रणनीतीवर आघाडी घेतली आहे. व्हिडीओंच्या माध्यमातून गतिमान आणि कल्पक प्रचार सध्या चर्चेचा विषय बनला आहे. सध्या एका यु-ट्यूब चॅनलवरून शिवसेनेला ‘लक्ष्य’ करीत त्यांची ‘खाऊसेना’ अशी टिंगल उडवली आहे. पालिकेतील भ्रष्टाचार आणि शिवसेनेवर घणाघाती आरोप करणाऱ्या या व्हिडीओज्मधून ‘जाग मतदार जाग, भ्रष्टाचाराने माजलाय वाघ’ असे म्हणत शिवसेनेला चिमटे काढले आहेत.अवघ्या आठ दिवसांवर येऊन ठेपलेल्या निवडणुकीत आता सोशल मीडियाच्या प्रचारात भाजपाने शिवसेना, काँग्रेस, मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मागे टाकल्याचे दिसून येते आहे. एका यु-ट्यूूूब चॅनलवर अ‍ॅनिमेशनच्या माध्यमातून ‘खाऊसेना प्रोडक्शन’ अशी टीका करत पालिकेतील भ्रष्टाचार, खड्ड्यांची समस्या, विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आलेले टॅब, पक्षातील घराणेशाही, हफ्तावसुली, पेंग्विन मृत्यू, आदित्यच्या बीएमडब्ल्यू कारचा अपघात, राणीबाग पुनर्विकास, नालेसफाई घोटाळा अशा विविध मुद्द्यांवर कार्टून्सच्या माध्यमातून जोरदार खिल्ली उडवली आहे. त्यात वाघाच्या कार्टूनच्या भूमिकेत शिवसेना आणि सिंहाच्या कार्टूनच्या भूमिकेत भाजपा दाखविण्यात आली आहे.