शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

चुकल्या माकल्या मुलांच्या चांगल्या आयुष्याची धडपड

By admin | Updated: November 14, 2014 00:13 IST

अनघड वयात हातून चुका होऊन किंवा कायद्याच्या चौकटी मोडून वाममार्गाला लागलेल्या मुलांच्या आयुष्याला दिशा देण्यासाठी बालसुधारगृहात निरनिराळे उपक्रम राबविले जात आहेत.

पुणो : अनघड वयात हातून चुका होऊन किंवा कायद्याच्या चौकटी मोडून वाममार्गाला लागलेल्या मुलांच्या आयुष्याला दिशा देण्यासाठी बालसुधारगृहात निरनिराळे उपक्रम राबविले जात आहेत. सुधारगृहात मुल गेलं म्हणजे त्या ठपक्याने मुल सुधारण्यापेक्षा जास्त बिघडेल, वांड होईल या विचाराला छेद देण्यासाठी सुधारगृहात ही प्रयोग होत आहेत.  मुलांच्या हातून चुका घडल्या तरी त्यांना सुधरण्याची संधी आणि त्या दिशेने वाटचाल करता यावी यासाठी बाल न्याय मंडळाच्या सुधारगृहातील मुलांना उपक्रमशील ठेवण्यात येत आहे. 
याविषयी बाल न्याय मंडळाचे सदस्य सुनील पाटील यांनी माहिती दिली. बालसुधारगृहात 8 वी ते 1क् वी वयोगटातील मुले सर्वाधिक सापडतात. चांगल्या घरातील मुले ही यात समाविष्ट असतात. 
पालक मुलांना उत्तमोत्तम देण्याच्या धडपडीत मात्र  भावनिक नाते निर्माण करायचेच विसरुन जातात. त्यामुळेच 
मुलांच्या हातून चूका घडत जातात आणि एका टप्प्याला त्यांच्या लक्षात येते की, कोणाचेच यावर ‘वॉच’नाही. मग ती वाहवतच जातात. यासाठी पालकांचे व मुलांचे समुपदेशन केले जाते. तसेच मुले जर वाहनचोरी करत असतील तर त्यांना एखाद्या मेकॅनिककडे प्रशिक्षणासाठी पाठविले जाते. जेणोकरून वाहन हाताळण्याची त्यांची इच्छा भागते आणि ते वाहनदुरूस्तीचे धडे ही घेतात. असे विविध प्रयोग केले जातात.
 
 
 
केवळ मुलांचे समुपदेशन करून चालत नाहीत तर पालकांनाही अनेक गोष्टी समजावून सांगणो गरजेचे असते. आपल्या मुलाने चूक केली हा धक्का पचवून त्याच्याशी सामान्यपणो वागेपर्यत पालकांकडूनही मुलांना गैरवागणूक मिळते.  पौगांडवस्थेत सगळ्याच गोष्टी वेगळ्या अर्थाने मुले घेत असतात. त्यामुळे पालकांनाही समजुतीच्या गोष्टी सांगाव्या लागतात. सुधारगृहातून परतलेल्या मुलांना त्यांच्या चुकांची टोचणी करून देण्यापेक्षा चांगल्या भविष्याविषयी कसे बोलावे हे सांगितले जाते. सध्या निरनिराळ्या शाळांमध्ये जाऊन मुले पालकांशी संवाद साधण्याचा प्रय} सुरू आहे. पालकांचे मुलांशी असणारे नाते कसे खुलवायचे याचे साधे टीप्स दिले जात आहेत. 
 
टाटा इन्स्टिटय़ूटच्या मदतीने संगणक प्रशिक्षण देणो, एमएच सीआयीटीचे प्रशिक्षण दिले जाते. त्यांचे समुपदेशन करून त्यांना सतत चांगल्या विचारांसाठी प्रोत्साहित केले जाते. जी मुले व्हाईटनर, दारू , तंबाखू किंवा सिगारेटच्या संपर्कात व्यसनात अडकली आहेत. त्यांना येरवडय़ातील व्यसनमुक्ती केंद्राच्या मदतीने व्यसनापासून परावृत्त करण्याचे प्रय} केले जातात. याशिवाय विविध खेळ घेणो, व्यायाम करवून घेतले जातात.                     -  सुनील पाटील, 
                  सदस्य बाल न्याय मंडळ