शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

झाडं जगविण्यासाठी धडपड

By admin | Updated: June 5, 2017 01:17 IST

घरची परिस्थिती जेमतेमच, आपल्या सलूनच्या व्यवसायातून जेवढे मिळेल त्यातूनच आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा

लोकमत न्यूज नेटवर्कखोडद : घरची परिस्थिती जेमतेमच, आपल्या सलूनच्या व्यवसायातून जेवढे मिळेल त्यातूनच आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा. स्वत:च्या कामातून वेळ काढून गावातील गरीब, निराधार आणि ज्येष्ठ नागरिकांची दाढीडोकी मोफत करून सामाजिक बांधिलकी जपायची आणि महत्त्वाचं म्हणजे मागील ५ वर्षांपासून गावात लावलेल्या आणि नैसर्गिकरीत्या आलेल्या झाडांना जगवायचं आणि त्यांचं पोटच्या पोराप्रमाणे संगोपन करायचं हे वर्णन वाचायला आणि ऐकायला चांगलं वाटतं पण दरवर्षी ऐन उन्हाळ्यात झाडांना डोक्यावरून पाणी आणून ही झाडं जगविणारा खोडद (ता.जुन्नर) येथील जालिंदर शिवराम कोरडे ऊर्फ जालुभाऊ या पर्यावरण मित्राची ही धडपड आहे. त्यांच्या कार्यामुुळे त्यांना या परिसरातील नागरिकांनी ‘वृक्षमित्र’ पदवी प्रेमाने बहाल केली आहे.खोडद गावातील आणि मैदानाच्या बाजूने असणाऱ्या १ हजार झाडांना जालुभाऊ यांनी मागील ५ वर्षे उन्हाळ्यात एकट्याने डोक्यावरून पाणी आणून या झाडांना घातले आहे. खोडदमध्ये कडुलिंब, कवठ, पिंपळ, वड, चिंच, नारळ, फायकस कदंब आदी झाडं आहेत. चालू वर्षी या झाडांची संख्या १२००च्या वर गेली आहे. ग्रामस्थ, ग्रामपंचायत यांनी लावलेली झाडं आणि याशिवाय नैसर्गिकरीत्या उगवलेली कडुलिंब, चिंच, कवठ, वड, पिंपळ या झाडांचे देखील जालुभाऊ यांनी अगदी उत्तमरीत्या संगोपन करून जगविले आहे.चालूवर्षी सर्व झाडांना ठिबक सिंचन करण्यात आले आहे. ठिबक सिंचन केले असले तरी उन्हाळ्याच्या दिवसांत या परिसारत पाण्याचे मोठे दुर्भिक्ष जाणवते. एकटाच पाणी आणून या झाडांना घालतो. या सर्व झाडांपैकी १ हजार झाडं ही आता सक्षम झाली आहेत. शासनाच्या आणि वनविभागाच्या वतीने झाडं लावण्यासाठी आणि पर्यावरण संवर्धन करण्याच्या कार्यक्रमांसाठी कोट्यावधी रुपये खर्च केले जातात. मात्र एखादा माणूस प्रत्यक्ष झाडं जगविण्याचा आणि पर्यावरण वाचविण्याचा प्रयत्न करत आहे.देवाला शोधायचे असेल तर देव झाडांमध्ये शोधावा कारण झाडं प्राणवायू देऊन आपला जीव वाचवत असतात. झाडं हे परमेश्वराचंच एक रूप आहे. झाडांमध्येच परमेश्वराचे दर्शन होईल. जगदगुरू राष्ट्रसंत संत तुकोबारायांनीदेखील पर्यावरण वाचविण्याचा संदेश दिला आहे. आपण मात्र त्याकडे काणाडोळा करतो. झाडं जगविताना मला साक्षात परमेश्वराचीच सेवा केल्याचा आनंद मिळतो. - जालुभाऊ कोरडे, वृक्षमित्र