शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
6
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
7
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
8
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
9
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
10
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
11
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
12
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
13
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
14
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
15
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
16
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
17
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
18
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
19
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
20
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

गर्दीच्या हंगामात एसटी ढेपाळली

By admin | Updated: May 15, 2014 02:35 IST

एसटी बसची असलेली दयनीय स्थिती आणि सातत्याने वाढत असलेले भाडे पाहता यंदाच्या गर्दीच्या हंगामात तर प्रवाशांनी एसटीकडे पाठ फिरवली आहे.

मुंबई : आर्थिक संकटात सापडलेल्या एसटीची सध्या मोठी वाताहत होत असून वर्षानुवर्षे असलेला नियोजनाचा अभाव, एसटी बसची असलेली दयनीय स्थिती आणि सातत्याने वाढत असलेले भाडे पाहता यंदाच्या गर्दीच्या हंगामात तर प्रवाशांनी एसटीकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे एसटी सेवा गर्दीच्या हंगामात सुरुवातीच्या ४0 दिवसांतच ढेपाळली आहे. यात मुंबई आणि औरंगाबाद क्षेत्रात प्रवाशांकडून अत्यल्प प्रतिसाद मिळाला असून अमरावती आणि नाशिक क्षेत्रातही स्थिती बिकटच असल्याचे समोर आले आहे. २0१0-११ मध्ये एसटीचे भारमान ६१.८४ टक्के होते. हेच भारमान २0११-१२ मध्ये ६१.७0 टक्के झाले. त्यानंतर, २0१२-१३ मध्ये ६0.४६ तर २0१३-१४ मध्ये ५८.५0 टक्के झाले. यावरूनच प्रवासी संख्या कमीकमी होत असल्याचे निदर्शनास आले. मात्र, २0१४ च्या गर्दीचा हंगाम असलेल्या एप्रिल ते जून या तीन महिन्यांत तरी परिस्थिती सुधारेल, अशी आशा एसटी महामंडळाला होती. मात्र, तसे न होता ती आणखीच बिकट होत चालली आहे. एसटीचा गर्दीचा हंगाम नेहमी १५ एप्रिलपासून सुरू होतो. यंदाच्या १ एप्रिल ते १0 मे या ४0 दिवसांची एसटीची परिस्थिती महामंडळाकडून तपासण्यात आली असता ती अक्षरश: ढेपाळल्याचे चित्र आहे. मुंबई क्षेत्रात येणार्‍या मुंबई, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि ठाणे विभागांतील भारमान मागील वर्षाशी तुलना करता यंदा ३.0३ टक्क्यांनी कमी झाले आहे. औरंगाबाद क्षेत्रात येणार्‍या औरंगाबाद, बीड, जालना, लातूर, नांदेड, उस्मानाबाद, परभणीचे भारमान २.५५ टक्क्यांनी कमी झाले आहे. अमरावती क्षेत्राचे २.४१ टक्क्यांनी, नाशिकचे १.७२ आणि नागपूर क्षेत्राचे १.१९ आणि पुणे क्षेत्राचे 0.९५ टक्क्यांनी कमी झाल्याचे एसटीतील सूत्रांनी सांगितले. (प्रतिनिधी)