शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

पार्किंगची कडक अंमलबजावणी

By admin | Updated: October 18, 2016 03:46 IST

मागील कित्येक वर्षे कागदावर असलेले पार्किंग धोरण आता प्रत्यक्षात राबवण्यास पालिकेने सुरुवात केली

ठाणे : मागील कित्येक वर्षे कागदावर असलेले पार्किंग धोरण आता प्रत्यक्षात राबवण्यास पालिकेने सुरुवात केली आहे. सध्या नाइट पार्किंग केले असून टप्प्याटप्प्याने उर्वरित पार्किंगही सुरू केले जाणार आहे. परंतु, महासभेने मंजूर केलेले दर आणि त्यातून पालिकेला मिळणारे उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ बसत नसल्याने पार्किंगमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी नियुक्त केल्या जाणाऱ्या खाजगी ठेकेदारावर होणारा १५ कोटींचा बोजा पालिका स्वत:च्या खांद्यावर घेणार आहे. ही योजना राबवण्यासाठी साधारणपणे ५० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. त्यामुळे या खर्चाची दरी भरून काढण्यासाठी पालिका १५ कोटींचा खर्च एकदाच करणार आहे. आॅफ स्ट्रीट पार्किंग, आॅन स्ट्रीट पार्किंग, मोकळे भूखंड, आरक्षित भूखंड आदी ठिकाणी आता पार्किंगची सुविधा उपलब्ध केली जात आहे. तसेच काही मिसिंग लिंकच्या ठिकाणीदेखील ती उपलब्ध होत आहे. काही ठिकाणच्या स्पॉटवर आखणीही केली जात आहे. परंतु, हे सर्व करीत असताना ते यशस्वी होईल की नाही, याबाबत पालिकेच्या मनात आता शंका आहेत. त्यामुळे हे धोरण सर्वसमावेशक करण्यासाठी खाजगी ठेकेदाराची मदत घेतली जाणार आहे. त्यानुसार, हा खाजगी आॅपरेटर मॅनपॉवर पुरवण्याबरोबर पार्किंगचे तिकीट देणे, वाहने पार्क करण्यासाठी जागा उपलब्ध आहे अथवा नाही, आदींसह इतर कामे करणार आहे. यासंदर्भातील प्रस्ताव येत्या महासभेत पटलावर ठेवण्यात आला आहे. दरम्यान, ठाणे महापालिकेने शहरातील पार्किंगचे स्पॉट अंतिम केल्यानंतर महासभेनेदेखील पार्किंगचे दर निश्चित केले आहेत. परंतु, उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ बसत नसल्याची बाब पालिकेने मान्य केली आहे. त्यामुळेच या प्रायव्हेट आॅपरेटरसाठी करण्यात येणाऱ्या खर्चाची जबाबदारी पालिका उचलणार असून यापोटी सुमारे १५ कोटींचा भुर्दंड पालिकेला सहन करावा लागणार आहे. प्रत्यक्षात या योजनेसाठी सुमारे ५० कोटींचा खर्च अपेक्षित असून पालिका यातील दरी भरून काढणार आहे. (प्रतिनिधी)>नाइट पार्किंगला शून्य प्रतिसाद ठाणे महापालिकेने नाइट पार्किंगला सुरुवात केली असली तरी त्याची माहिती वाहनचालकांना नसल्याने याला शून्य प्रतिसाद मिळत असल्याचे पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी सांगितले. त्यामुळे येत्या १५ नोव्हेंबरपासून नाइट पार्किंगच्या ठिकाणी पार्क होणाऱ्या वाहनांवर येत्या १ नोव्हेंबरपासून १० टक्के दंड आकारणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच या ठिकाणी २०० वॉर्डन नेमले जाणार असून प्रत्येक प्रभाग समितीमध्ये २० वॉर्डनद्वारे दंडवसुलीचे काम केले जाणार आहे. तर, १०० जॅमरदेखील खरेदी केले जाणार असून वाहनचालकांनी मासिक पास घेतला नाही तर मात्र जॅमर लावून पुढील कारवाई केली जाईल.