शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
2
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
3
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
4
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
5
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
6
Latest Marathi News LIVE: होर्मुझ सामुद्रधुनीचा पेच, तणाव वाढला; ४० देशांची होणार बैठक, ब्रिटन-फ्रान्सने घेतला पुढाकार
7
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
8
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
9
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
10
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
11
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
12
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
13
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
14
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
15
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
16
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
17
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
18
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
19
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
20
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

पुरेशा संख्येअभावी पोलिसांवर ताण

By admin | Updated: May 28, 2014 00:32 IST

वेगाने होणारे नागरिकीकरण, रस्त्यावर वाढलेली वाहतूक यात सर्वत्र वाढ होत असली तरी येथील पोलिसांची संख्या मात्र १९५२ साली मंजूर झालेलीच आहे

सासवड : सासवड हे पुरंदर तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे. शहराची वाढती लोकसंख्या, वेगाने होणारे नागरिकीकरण, रस्त्यावर वाढलेली वाहतूक यात सर्वत्र वाढ होत असली तरी येथील पोलिसांची संख्या मात्र १९५२ साली मंजूर झालेलीच आहे. त्यामुळे पोलिसांवर अकारण ताण येत आहे. सासवड पोलिस स्टेशनला स्वत:ची इमारत नाही. एसटी च्या जुन्या जागेमध्ये तात्पुरती डागडुजी करून पोलीस स्टेशन शहरात आणले आहे. परंतु येथे पुरेशा सोयी नाहीत. नवीन इमारत आवश्यक आहे; रस्ता रुंदीकरणाच्या कामात या कार्यालयाची बरीच जागा जाणार आह.े पोलिस स्टेशन जरी शहरात असले तरी कारागृह मात्र गावाच्या दुस-या टोकाला असणा-या तहसील कार्यालयाच्या इमारतीत आहे. या शिवाय तालुक्यात नारायणपूर, बालाजी, पुरंदर किल्ला, सासवड, जेजुरी या ठिकाणी जाणा-या भाविकांची गर्दी वाढली आहे. वीर येथे १० दिवस यात्रा चालते. त्या वेळीही बंदोबस्त ठेवावा लागतो. वेळोवेळी मागणी करूनही कर्मचारी संख्या वाढलेली नाही. याचा परिणाम गुन्हे शोधण्यावर होतो. पोलीस स्टेशनमध्ये तक्रारी नोंदविण्याचे प्रमाण सध्या वाढले आहे. काही वर्षांपूर्वी तक्रार नोंदणी न होता तडजोड करा व मिटवा असा प्रकार चालत असे सासवड व परिसरात घरफोडी, मोटार सायकल चोरी, मोबाईल चोरी असे प्रकार वाढले आहेत. परंतु, या गुन्ह्यांचा तपासच लागत नाही. पुरंदरमध्ये राजकीय हस्तक्षेपालाही सामोरे जावे लागते. दोन तीन वर्षापूर्वी येथील अधिकारी काही प्रकरणात सापडले व निलंबित झाले. अर्थात, ही प्रकरणे सासवड येथे झालेली नव्हती. पण येथे आल्यावर कारवाई झाल्याने अधिकारी टिकतच नव्हते. आता अधिकारी आहेत. परंतु, कर्मचारी कमी आहेत. वाहतूक वाढल्याने तेथेही कर्मचारी अडकले जातात. त्यातच दोन वर्षात बदली होणार असल्याचे कळल्याने कर्मच-यात नाराजी आहे. सासवड पोलीस स्टेशन हदीत ४८ ग्रामपंचायती आहेत व १ नगरपालिका आहे. या सर्व ठिकाणी बंदोबस्त करण्यास कर्मचारी अपुरे पडतात. या शिवाय उस दर आंदोलन, टोल नका आंदोलन होते त्या ठिकाणी या कर्मच-यांना जावे लागते. काही वेळा या पोलिस स्टेशनमध्ये एक किंवा दोन कर्मचारी असतात. एखादी घटना घडल्यावर पोलिसांनी तत्काळ दाखल घ्यावी असे नागरिकांना वाटते. परंतु ते शक्य होत नाही. अवैध दारू धंद्यांवर फार कमी प्रमाणात कारवाई होते. एकंदरीतच या पोलिस स्टेशनला पुरेसा कर्मचारी वर्ग व अद्ययावत इमारतीची गरज आहे. अनेक अडचणी असूनही पोलीस स्टेशनच्या हद्दीत तंटामुक्तीचे काम गतवर्षी चांगले होते, ही समाधानाची बाब आहे. (वार्ताहर)