शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती आहे UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

एसटीपी प्रकल्पाची आज चाचणी होणार

By admin | Updated: May 8, 2014 12:24 IST

पहिला टप्पा : उच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे महापालिकेची तयारी पूर्ण

 कोल्हापूर : कसबा बावड्यातील घरगुती सांडपाणी प्रक्रिया केंद्राच्या (एसटीपी) तांत्रिक चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. उद्या (गुरुवार) जयंती नाल्यातील सांडपाण्याची चाचणी घेतली जाणार आहे. पहिल्या टप्प्यातील २४ दशलक्ष सांडपाण्यावर चाचणी घेणार असल्याचे महापालिकेने उच्च न्यायालयास सांगितले आहे. कसबा बावडा येथील या प्रक्रिया केंद्रातील विविध तांत्रिक चाचण्या घेण्यात आल्या. महावितरणकडून वीजपुरवठा व वीज मिटर मिळविण्याची प्रक्रिया गेली तीन दिवस सुरू आहे. वीज पुरवठा सुरळीत झाल्यानंतर बुधवारी सायंकाळपर्यंत महापालिकेने पाण्याची प्रत्यक्ष चाचणी घेण्याचा प्रयत्न केला. रात्री उशिरा प्रयत्न केल्यानंतर गुरुवारी दुपारी प्रत्यक्ष चाचणी घेण्याचे ठरले. केंद्रासाठी अत्यंत उच्च दर्जाचे तंत्रज्ञान वापरले आहे. मानवी व स्वयंचलित यंत्रणा कार्यान्वित केली आहे. मैला नष्ट करणार्‍या जीवाणंूची निर्मिती करून पाण्यातील आॅक्सिजनचे प्रमाण वाढविणारे तंत्रज्ञान वापरण्यात येणार आहे. सांडपाण्यासाठी १२.५ एमएलडीच्या सहा मोठ्या टाक्या बांधल्या आहेत. एकाचवेळी ७६ एमएलडी पाण्यावर प्रक्रिया केली जाणार आहे. प्रक्रिया केलेले पाणी इतर कारणांसाठी वापरून उरलेले पाणी नदीत सोडले जाणार आहे. पहिल्या टप्प्यातील चाचणीसाठी एका टाकीत १२ एलएलडी पाणी साठवले आहे. या पाण्यावर प्रथम प्रक्रिया केली जाणार आहे. यानंतर जयंती नाल्यातील पाण्यावर चाचणी घेतली जाणार आहे. महापालिकेने याबाबतची सर्व तयारी पूर्ण केल्याचे सूत्रांनी सांगितले.