शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
5
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
6
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
7
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
8
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
9
हा सदोष मनुष्यवधच!
10
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
11
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
12
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
13
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
14
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
15
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
16
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
17
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
18
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
19
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

‘आम्ही महाराष्ट्रीयन’ गाण्याची गोष्ट आज ‘मी मराठी’वर

By admin | Updated: May 1, 2016 03:41 IST

‘लोकमत’ने तयार केलेल्या ‘आम्ही महाराष्ट्रीयन’ या गाण्याची गोष्ट आज १ मे, महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने ‘मी मराठी’ वाहिनीवर उलगडली जाणार आहे. महाराष्ट्राचे गुणगौरव करणारे हे गीत मराठी

मुंबई : ‘लोकमत’ने तयार केलेल्या ‘आम्ही महाराष्ट्रीयन’ या गाण्याची गोष्ट आज १ मे, महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने ‘मी मराठी’ वाहिनीवर उलगडली जाणार आहे. महाराष्ट्राचे गुणगौरव करणारे हे गीत मराठी - हिंदीतील प्रमुख अशा २१ गायकांनी गायले आहे. सुरेश वाडकर, शंकर महादेवन, रूपकुमार राठोड, जावेद अली, महालक्ष्मी अय्यर, बेला शेंडे, स्वप्निल बांदोडकर, अजित परब, सुनाली राठोड, अनुराधा पौडवाल, साधना सरगम आदींचा या गाण्यात सहभाग असून, मराठीतील आघाडीचा अभिनेता पुष्कर श्रोत्री यांनी या गाण्याची चित्रफीत दिग्दर्शित केली आहे. या गाण्याच्या निर्मितीमागची गोष्ट सांगण्यासाठी कवी, गीतकार अरुण म्हात्रे, संगीत दिग्दर्शक परीक्षित भातखंडे, प्रख्यात गायिका वैशाली सामंत, तरुण पिढीचा गायक मंगेश बोरगावकर कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. मी मराठी वाहिनीवर एक तासाचा विशेष कार्यक्रम १ मे रोजी सकाळी १०.३० वाजता प्रसारित केला जाणार असून, दुपारी ३ वाजता आणि रात्री ११ वाजता त्याचे पुन:प्रक्षेपण होणार असल्याची माहिती मी मराठीचे संपादक तुळशीदास भोईटे यांनी दिली. आज सगळ्या चित्रपटगृहांतहीयूएफओच्या माध्यमातून राज्यभरात ज्या ज्या चित्रपटगृहांत चित्रपट दाखवले जातात त्या सगळ्या ठिकाणी १ मेच्या निमित्ताने प्रत्येक शोच्या आधी या गाण्याचा १ मिनिटाचा भाग दाखवला जाणार आहे. हे गाणे यूट्युबवर ‘आम्ही महाराष्ट्रीयन’ असे टाकल्यास सहज उपलब्ध असून, www.lokmat.com या साईटवर ते पाहता येईल.