शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
3
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
4
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
5
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
6
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
7
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
8
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
9
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
10
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
11
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
12
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
13
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
14
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
15
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
16
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
17
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
18
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
Daily Top 2Weekly Top 5

अलिबाग समुद्र किनारपट्टीला वादळाचा तडाखा

By admin | Updated: September 17, 2016 16:31 IST

वादळी वा-याने कोकण किनारपट्टीला चांगलाच तडाखा दिला असून अलिबाग समुद्र किना-यावरील निवाराशेड उडून गेली आहे. आतापर्यंत करोडो रूपयांच्या नुकसानीचा फटका

जयंत धुळप/ऑनलाइन लोकमत
अलिबाग,दि.17- वादळी वा-याने कोकण किनारपट्टीला चांगलाच तडाखा दिला असून अलिबाग समुद्र किनार्‍यावरील निवाराशेड उडून गेली आहे. आतापर्यंत करोडो रुपयांच्या नुकसानीचा फटका रायगड जिल्ह्याच्या किनारपट्टीला बसला आहे.  खोल समुद्रातून मासेमारी करुन परतत असताना अनेक मच्छीमार नौका समुद्रात भरकटल्या असून काही मच्छीमारांची जाळी समुद्रात वाहून गेले आहेत. अलिबाग कोळीवाड्यातील नाखवा यांची छोटी मासेमारी नौका या वादळाच्या तडाख्यात फुटली आहे.
 
48 तासात वादळी वार्‍यासह मुसळधार पावसाचा इशारा शुक्रवारी हवामान विभागाने दिला होता. रात्रीपासूनच विजांच्या गडगडासह पावसाला सुरूवात झाली होती. शनिवारी सकाळी 10 वाजल्यानंतर वार्‍याचा वेग वाढला. याचा फटका मोरा बंदर, मांडवा, किहीम, वरसोली, अलिबाग, साखर-आक्षी, ताराबंदर, एकदरा, खोरा बंदर, आगरदांडा, जिवनाबंदर या ठिकाणच्या मच्छीमारांना जबरदस्त बसला. लाटांच्या तडाख्याने बंदरात नांगरुन ठेवलेल्या मच्छीमारी नौका भरकटल्या आहेत.
दरम्यान, या वादळीसदृश्य परिस्थितीत कोणीही मच्छीमार समुद्रात बेपत्ता झालेला नसल्याची माहिती मच्छीमारी संस्थांकडून देण्यात येत आहे.
 
अलिबाग समुद्र किनार्‍यावरील निवारा शेड वार्‍याने उडून गेल्यानंतर नगरपालिकेच्या कर्मचार्‍यांनी तत्काळ घटनास्थळी हजर राहून तिच्या दुरुस्तीचे काम सुरू केले. दुपारी 12.30 वाजता अग्नीशमन दलाच्या मदतीने निवारा शेडवरील ताडपत्री पुन्हा टाकण्याचे काम सुरू झाले होते. या सर्व घटनेवर अलिबाग नगरपालिका प्रशासन देखरेख करीत आहे. नगरपालिका प्रशासनाच्या तत्परतेमुळे येथे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.