शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
2
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
3
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
4
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
5
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
6
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
7
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
8
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
9
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
10
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
11
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
12
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
13
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
14
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
15
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
16
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
17
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
18
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
19
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
20
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
Daily Top 2Weekly Top 5

जव्हारफाटा उड्डाणपुलासाठी रास्ता रोको

By admin | Updated: October 18, 2016 03:22 IST

नेहमी होणारे अपघात टाळण्यासाठी उड्डाण पूल व्हावा यासाठी आज शिवसेना व परिसरातील ग्रामस्थांच्या वतीने रास्ता रोको करण्यात आले

मनोर : मुंबई अहमदाबाद महामार्गावर जव्हार फाट्या जवळ नेहमी होणारे अपघात टाळण्यासाठी उड्डाण पूल व्हावा यासाठी आज शिवसेना व परिसरातील ग्रामस्थांच्या वतीने रास्ता रोको करण्यात आले होते त्यानंतर एन एच आय व आय आर बी कंपनीच्या अधिकाऱ्यांना निवेदन दिले. उड्डाणपुलासाठी लवकरात लवकर प्रयत्न करू असे आश्वासन त्यांनी दिले.मनोर जवळील मुंबई अहमदाबाद महामार्गावर जव्हार फाठ्या जवळ नेहमी अपघात होत असून आतापर्यंत चाळीस ते पन्नास लोकांना आपले प्राण मुकावे लागले या आधीही ग्रामस्थ तसेच काही संघटना तर्फे उड्डाण पूल व्हावा यासाठी मागणी करण्यात आली होती मात्र त्या मागणीला संबंधित खात्याने केराची टोपली दाखवली म्हणून आज शिवसेनेचे पंचायत समिती सदस्य पांडुरंग गोवारी यांच्या नेतृत्वाखाली रस्ता रोको करण्यात आला होता त्यावेळी जगदीश धोडी यांनी सांगितले की, उड्डाण पूल झाले नाही तर आंदोलन तीव्र करू आजपासून अपघात घडला आणि माणूस मृत्यू पावला तर आय आर बी कंपनी व एन एच आय वर ३०२ कलमाखाली गुन्हा दाखल करू उप जिल्हाप्रमुख वसंत चव्हाण शिवसेना म्हणाले की गेल्या पाच वर्षात हजारो अपघात होऊन शेकडो लोकांचे प्राण गेले आहे तरी उड्डाण पूल लवकर तयार करावा.या मागणीसाठी सावरखंड, भोपोली, कोसबाड, नालसेत, टाकव्हल, टेण, नांदगाव येथील सेना रा. कॉंग्रेस भूमीसेना काँग्रेस सर्व पक्षीय कार्यकर्ते ग्रामस्थ सहभागी झाले होते. या वेळी मुंबई अहमदाबाद महामार्ग दहा ते वीस मिनीटे रोखले होते त्यानंतर आंदोलनकर्त्यांना उठवून वाहतूक सुरळीत केली मनोज चाळके यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. (वार्ताहर)>जव्हार फाटा व नांदगाव उड्डाणपुलाच्या प्रस्तावाच्या मान्यतेसाठी दिल्ली येथील कार्यालयात मी पाठपुरावा करीत आहे.-दिनेश अग्रवाल, एन एच आय अधिकारी >आॅर्डर मिळाली की कंपनी लगेच कामाला सुरवात करेल. तसेच जव्हार फाट्यावर उड्डाण पूल होणे गरजेचा आहे नेहमी या ठिकाणी अपघात घडतात निष्पाप लोकांचे प्राण जातात.- साठे , आय आर बी चे अधिकारी