शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

स्मशानातील राखेवर पोट

By admin | Updated: November 29, 2015 01:53 IST

स्मशानात प्रेतासोबत अर्धवट जळालेली लाकडे, नदीपात्रात विसर्जित अस्ती व राखेतून सोने-चांदी, किडूकमिडूक, जोडवे यावर झारेकऱ्यांचा उदरनिर्वाह होतो़.

- पंडित भारुड,  संवत्सरस्मशानात प्रेतासोबत अर्धवट जळालेली लाकडे, नदीपात्रात विसर्जित अस्ती व राखेतून सोने-चांदी, किडूकमिडूक, जोडवे यावर झारेकऱ्यांचा उदरनिर्वाह होतो़नगर जिल्ह्यातील कोपरगाव येथील गोदावरी नदीत गेल्या तीन पिढ्यांपासून झारेकरी काम करीत आहेत़ ६५ वर्षीय वृद्ध झारेकरी भीमराव सुखदेव जगधने, शकुंतला जगधने, भीमबाई यादवराव सोळसे, विमलबाई नाना थोरात, मीराबाई वसंत मरसाळे, सावित्री सुभाष आहेर व त्यांच्या छोट्या मुलांसमवेत ही झारेकरी मंडळी आपल्या दु:खाची कहाणी सांगत होत्या़ ‘पूर्वापार आमचे हेच काम आहे़ नदीपात्रात पाणी असो अगर नसो़ पात्रातील वाळूतून स्मशनातील अर्धवट जळालेली लागडे, बाबूंचे तुकडे, अस्ती, राख नदीपात्रात विसर्जित केल्यानंतर वाळूत शोधून त्या सोन्यातून, चांदीतून दररोजचे कधी २०० तर कधी पाचशे रुपयांचे उत्पन्न मिळते़ सोने-चांदी विकून आमचा उदरनिर्वाह चालतो़ त्याच अर्धवट जळालेल्या लाकडावर अन्न शिजवायचे़ हे अन्न खाऊन झारेकरी सकाळी नऊ वाजल्यापासून दुपारी तीनपर्यंत काम करतात़ स्मशानातील वाळूतले सोने-पैसे, जोडवे, गरे, कुंडकं, मणी शोधण्यासाठी पाण्यातून वाळू उपसण्याचा एकच क्रम. कधी एवढी वाळू उपसून, चाळून घाम निघतो, पण चहा-पाण्याइतके देखील पैसे मिळत नाहीत. कोपरगावमध्ये जवळपास दहा ते बारा जण हे काम करतात़ त्यामध्ये महिलांचे प्रमाण अधिक आहे़ रेशनकार्ड मिळावे, शासनाच्या योजनांचा लाभ मिळावा, अण्णाभाऊ साठे महामंडळाकडून मदत मिळावी,’ अशी त्यांची मागणी आहे़ वृद्ध भीमराव जगधने पाण्यात उघडे होऊन डुबकी मारतात़ पाणी शांत होते़ काही वेळ पाण्यात श्वास रोखतात़ हातात घमेले घेऊन वर येतात़ घमेल्यात केवळ वाळूच असते़ ती चाळून पाहतात, पण काहीच नाही़ पुन्हा तोच प्रयत्ऩउपासमारीची वेळ : ‘छोटी मुलेही आमच्याबरोबर असतात़ त्यामुळे त्यांना शिक्षण कोठून द्यायचे, या व्यवसायात आता ‘राम’ राहिला नाही़ असे भीमराव जगधने सांगतात़ श्रीमंत लोक अस्ती विसर्जनासाठी नाशिकला जातात़, तर मध्यमवर्गीय सोने-नाणे काहीच ठेवत नाही़ आता लोक सुट्टे पैसेदेखील नदीपात्रात टाकत नाहीत़ म्हणून आमच्यावर उपासमारीची वेळ येते,’ असे ते म्हणाले़