शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

मोजके पदार्थ, मोजका थाटमाट

By admin | Updated: November 29, 2015 01:59 IST

आर्थिक सुबत्ता दाखविण्यासाठी विवाहात अनावश्यक खर्च केले जातात. लग्न पत्रिका, भोजन, फटाक्यांची आतषबाजी यासह अन्य बाबींवर मोठ्या प्रमाणात अवास्तव खर्च करण्यात येतो. काही लग्नांमध्ये

- विजयकुमार सैतवाल,  जळगावआर्थिक सुबत्ता दाखविण्यासाठी विवाहात अनावश्यक खर्च केले जातात. लग्न पत्रिका, भोजन, फटाक्यांची आतषबाजी यासह अन्य बाबींवर मोठ्या प्रमाणात अवास्तव खर्च करण्यात येतो. काही लग्नांमध्ये तर खाद्यपदार्थांची मोठी रेलचेल असते, त्यामुळे अन्न वाया जाते. हे टाळण्यासाठी जळगावातील सकल जैन समाजासाठी आदर्श नियमावली तयार करण्यात आली आहे. त्यानुसार मोजकेच खाद्यपदार्थ करण्यासह थाटमाटालाही आवर घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नवरा मुलगा अथवा नवरी मुलगी यांची हौसमौस व्हावी, तसेच सुबत्तेचे दर्शन घडविण्यासाठी विवाह समारंभात मोठा खर्च करण्याची जणू स्पर्धाच लागल्याचे दिसून येते. मात्र, जळगावातील सकल जैन समाजाने पुढाकार घेत, अनावश्यक खर्चाला पायबंद घालण्यासाठी एक नियमावलीच तयार केली. समाजबांधवांची बैठक होऊन त्यात सर्वानुमते अनावश्यक खर्च टाळण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यात खाद्यपदार्थ मर्यादित ठेवण्यावर एकमत झाले. समाजातील दुर्बल घटकांना मदत करण्यासाठी श्रीमंतांनी काटकसर केल्यास वावगे नाही, स्वत:पासूनच परिवर्तनाचे पाऊल उचलण्याचे आवाहन अशोक जैन यांनी केले.यथोचित सत्कार होणारसकल जैन बांधवांच्या घरोघरी नियमावली पाठविण्यात येणार असून, लग्नसमारंभ अथवा इतर कोणत्याही कार्यक्रमात त्याचे पालन करणाऱ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. अवाढव्य खर्च करणाऱ्यांच्या लग्नाला जायचे. मात्र, न जेवताच परत यायचे, असा विचार ठेवण्यात आला आहे.अहिंसा तत्त्व पाळाजैन समाजात अहिंसेला मोठे स्थान आहे. रात्रीचे समारंभ बंद करण्याचाही विचार मांडण्यात आला. रात्री मोठ्या दिव्यांमुळे कीडे-किटक यांचा मृत्यू होऊ शकतो. आपले पूर्वज रात्री जेवत नव्हते, याचीही जाणीव या निमित्ताने करून देण्यात येणार आहे. पदार्थांची संख्या मर्यादितसामूहिक भोजन व विवाह कार्यक्रमात नाष्ट्यासाठी नऊ, भोजनात २१, कुंकुममध्ये ३ तर धार्मिक व सामाजिक भोजनात १० पदार्थ असावेत, असा निर्णय घेण्यात आला आहे.पाच सदस्यांची समिती जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष अशोक जैन यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यांची समिती तयार केली होती. त्यात दिलीप गांधी, अजय ललवाणी, अनिल देसर्डा, महेंद्र जैन, प्रदीप मुथा यांचा समावेश होता. त्यांनी नियमावली तयार करून बैठकीत मांडली.लग्न समारंभात अन्न वाया जाते. ते भुकेल्यांना मिळावे, तसेच इतर गोष्टींवर करण्यात येणारा अनाठायी खर्चाला आळा बसला पाहिजे. यासाठी आपणच पुढाकार घेणे गरजेचे आहे. - दलुभाऊ जैन, सकल जैन समाज समाज संघपती, जळगाव