शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

एसटीला ‘एक्स्प्रेस’ फटका

By admin | Updated: March 30, 2017 04:02 IST

एसटी महामंडळाचा तोटा वर्षाला वाढत असतानाच, त्यातून दिलासा मिळावा, यासाठी टोलमाफीची मागणी सातत्याने केली

मुंबई : एसटी महामंडळाचा तोटा वर्षाला वाढत असतानाच, त्यातून दिलासा मिळावा, यासाठी टोलमाफीची मागणी सातत्याने केली जात आहे. शासनाकडून गेल्या काही वर्षांत राज्यातील टोल नाक्यांमधून एसटीची सुटका करत दिलासा दिलेला असतानाच मात्र, मुंबई-पुणे एक्स्प्रेस मार्गावरील टोलमधून सूट देण्यात अद्यापही यश मिळालेले नाही. या मार्गावर १ एप्रिलपासून वाढीव टोल लागू होत असून, त्यामुळे महिन्याला ३१ लाख रुपयांहून अधिकचा टोलभार एसटीला सहन करावा लागेल. मुंबई-पुणे एक्स्प्रेस मार्गावरून एसटीच्या शिवनेरी, सेमी लक्झरी आणि परिवर्तन बसेस मोठ्या प्रमाणावर धावतात. शुक्रवार ते रविवार या तीन दिवसांत एसटीच्या बसेसला चांगलाच प्रतिसाद मिळतो. त्यामुळे या मार्गावर एसटीकडून विशेष लक्ष देण्यात येते. सध्या मुंबई-पुणे एक्स्प्रेस मार्गे १ हजार २५ बसफेऱ्या होतात. या मार्गावरून धावताना, यातील प्रत्येक बसफेरीमागे या आधी एसटीला ५७२ रुपये टोल भरावा लागत होता. आता १ एप्रिलपासून मुंबई-पुणे एक्स्प्रेस मार्गावरील टोलमध्ये वाढ करण्यात आली असून, त्यामुळे एसटीला ६७५ रुपये टोल भरावा लागेल. जवळपास १0३ रुपये एवढा जादा टोल द्यावा लागणार असल्याने, प्रत्येक दिवशी १ लाख ५ हजार रुपयांपेक्षा अधिक, तर महिन्याला ३१ लाखांहून अधिक टोल भरावा लागणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. सध्या मुंबई-पुणे एक्स्प्रेस मार्गावर एसटीकडून प्रत्येक दिवशी ६ लाख ९ हजार, याप्रमाणे महिन्याला १ कोटी ७३ लाखांचा टोल भरला जातो. यामुळे एसटीला लाखोंचा आर्थिक फटका सहन करावा लागेल. एकीकडे एसटीला पूर्णपणे टोलमुक्ती देण्यात येईल, असे आश्वासन दिले जात असतानाच, चांगला प्रतिसाद मिळणाऱ्या मुंबई-पुणे एक्स्प्रेसकडे मात्र, दुर्लक्षच होताना दिसते. (प्रतिनिधी)नोटाबंदीमुळे ६ कोटी ७६ लाखांची बचत२0१६ मधील नोव्हेंबर महिन्यात केंद्र सरकारने ५०० आणि १००० रुपयांच्या जुन्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेतला होता. टोल नाक्यांवरही नोटकल्लोळाचा फटका बसल्याने, यातून सरकारने वाहन चालकांना दिलासा दिला. त्यामुळे महामंडळाला दिलासा मिळाला आणि ६ कोटी ७६ लाखांहून अधिकची बचत झाली.