शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
2
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
3
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
4
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
5
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
6
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
7
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय
8
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
9
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
10
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
11
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
12
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
13
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं
14
Air India Plane Crash: ‘त्या’ विमानात कोणताही बिघाड नव्हता, एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांची ग्वाही
15
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
16
Navi Mumbai: मुलीवरून चिडवल्याने मित्राचा कापला गळा, नवी मुबईतील घटनेने खळबळ!
17
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
18
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
19
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
20
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!

चिमुरडीच्या मृत्यू प्रकरणी सावत्र आईला अटक

By admin | Updated: August 1, 2016 02:11 IST

अ‍ॅन्टॉप हिल परिसरातील बंगालीपुरा झोपडपट्टीत राहणाऱ्या एका दीड वर्षांच्या मुलीचा दोन दिवसांपूर्वी संशयास्पद मृत्यू झाला होता.

मुंबई: अ‍ॅन्टॉप हिल परिसरातील बंगालीपुरा झोपडपट्टीत राहणाऱ्या एका दीड वर्षांच्या मुलीचा दोन दिवसांपूर्वी संशयास्पद मृत्यू झाला होता. या प्रकरणी अ‍ॅन्टॉप हिल पोलिसांनी मुलीच्या सावत्र आईवर गुन्हा दाखल करत आज तिला अटक केली आहे.मयत मुलीची आई काही दिवसांपूर्वीच तिला सोडून गेल्याने तिच्या वडिलांनी दुसरे लग्न केले होते. त्यामुळे ही मुलगी देखील तिची सावत्र आई रजिया रसुल शेख (२४) हिच्यासोबतच राहत होती. शुक्रवारी मुलगी घरात खेळत असताना तिच्या आईने रागाच्या भरात तिला मारहाण केली. या दरम्यान धक्का लागून ही मुलगी जमिनीवर आपटली. त्यामुळे तिच्या डोक्याला गंभीर जखम झाली होती. तिला तत्काळ सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला. अ‍ॅन्टॉप हिल पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी पहिल्यांदा एडिआर दाखल केला होता. मात्र शवविच्छेदन अहवालामध्ये मुलीचा मृत्यू डोक्याला मार लागून झाल्याचे पोलिसांना समजताच त्यांनी तत्काळ रजियाला ताब्यात घेतले. तिच्याकडे चौकशी केली असता तिने गुन्ह्याची कबुली दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करत महिलेला अटक केली आहे. (प्रतिनिधी)