शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
2
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
3
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
4
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
5
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
6
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
7
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
8
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
9
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
10
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
11
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
12
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
13
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
14
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
15
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
16
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
17
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
18
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
19
कामाची गोष्ट! पीठ मळल्यानंतर किती वेळात वापरता येतं, कधी खराब होतं, फ्रिजमध्ये ठेवायचं का?
20
Video: पहलगाम, RCB ते विमान अपघात..; 2025 मध्ये घडलेल्या घटनांवर तरुणाने बनवले गाणे

स्थानकांचा कारभार सुधारणार स्थानक संचालक

By admin | Updated: October 3, 2016 05:39 IST

रेल्वे स्थानकांचा कारभार सुधारण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने देशभरातील ७५ स्थानकांवर स्थानक संचालकांची नेमणूक करण्याचा निर्णय घेतला

मुंबई : रेल्वे स्थानकांचा कारभार सुधारण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने देशभरातील ७५ स्थानकांवर स्थानक संचालकांची नेमणूक करण्याचा निर्णय घेतला असून, मुंबईतील सीएसटी व एलटीटी येथे त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.रेल्वे स्थानकांचा चेहरामोहरा बदलून टाकण्यासाठी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी ७५ महत्त्वाच्या स्थानकांचा कारभार उच्चपदस्थ रेल्वे अधिकाऱ्यांकडे सोपवण्याचा निर्णय घेतला. यात केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमधून निवडलेल्या अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. त्यानुसार सीएसटी येथे परिचालन विभागातील विभागीय परिचालन व्यवस्थापक (मालवाहतूक)शिवाजी सुतार आणि एलटीटी येथे परिचालन व्यवस्थापक (कोचिंग)रॉबिन कालिया यांची नियुक्ती केली आहे. स्थानकांवर सध्या स्टेशन अधीक्षक कार्यरत आहेत. मात्र या अधिकाऱ्यांना निधीशी संबंधित कोणताही निर्णय घेण्याचा अधिकार नाही. स्थानकांवरील प्रवासी वाहतूक, मालवाहतूक, तिकीटविक्री, पार्सल, मालवाहतूक यासाठी असलेल्या विविध विभागांचे प्रमुख निर्णय घेतात. आता या विभागांशी संबंधित सर्व निर्णय हे स्थानक संचालक घेतील. या स्थानक संचालकांना विभागीय रेल्वे व्यवस्थापकांकडेही जाण्याची गरज नसेल, असे रेल्वेतील सूत्रांकडून सांगण्यात आले. स्थानक संचालकांकडे निधी देण्यासंबंधीचे निर्णय आल्याने स्थानकातील प्रवासी सुविधेसाठी लागणारे निर्णय झटपट होण्यास मदत मिळेल. (प्रतिनिधी)