शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

परराज्यातील रुग्ण पाठवला स्वगृही

By admin | Updated: August 22, 2016 03:55 IST

शासकीय रुग्णालय म्हटले, नेहमीच रुग्णाच्या नातेवार्इंकांची बोंम्बा-बोम्ब असते.

पंकज रोडेकर,

ठाणे- शासकीय रुग्णालय म्हटले, नेहमीच रुग्णाच्या नातेवार्इंकांची बोंम्बा-बोम्ब असते. मात्र, ठाणे सायन्ना शासकीय रुग्णालयाने या गोष्टीला छेद देऊन, नवा फंडा घातला आहे. या रुग्णालयात पोलिसांनी दाखल केलेल्या अनोळखी तरुणावर वेळीच योग्य उपचार करून त्याची ओळख पटवून त्याला स्वगृही धाडण्यात यश आले आहे. विशेष म्हणजे या रुग्णाला धड बोलताही येत नसताना, त्याच्याकडून मिळणाऱ्या अपुऱ्या आणि तोकड्या माहितीच्या आधारे जिल्हारुग्णालय प्रशासनाने त्याच्या नातेवाईकांचा शोध घेतला आहे.नौपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत चार महिन्यापूर्वी घनश्याम हा जखमी अवस्थेत पोलिसांना सापडला. त्याच्या डोक्यावर जखम झाल्याने आणि त्याला वारंवार आकडी येत असल्याने पोलिसांनी त्याला शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. त्यावेळी जिल्हा सामान्य रु ग्नालयातील डॉ. शिंदे, डॉ.शामा राठोड व आर.के.काळे या पथकांने त्याच्या उपचारावर विशेष लक्ष देत बरे केल्यानंतर रु ग्णालयातील मनोविकृती सामाजिक कार्यकर्ते श्रीरंग सिद यांनी त्याला नाव विचारले असता, तो केवळ घनश्याम कंचम एवढेच सांगायचा. तसेच गावाचे नाव सुसकाल येवढेच सांगत असे. घनश्यामला नीट बोलता येत नसल्याने त्याला घरी पाठविण्याचा पण या मंडळींनी केला. त्याच्या गावापासून नातेवाईकांचा शोध सुरू झाला. सिद यांनी डॉ. चंद्रशेखर सावंत यांच्या मदतीने सोशल मिडीयाचा वापर करून सुसकाल म्हणजे काय ते कुठे आहे. याचा शोध घेतला. सुसकाल हे गुजरात राज्यातील छोटे उदयपूर या जिल्ह्यातील जेठापूर तालुक्यात असल्याचे समोर आले. तेथील स्थानिक पोलीस ठाण्याचा शोध घेतल्यावर जेठापूर पोलिसांशी संपर्कत्यांना साधून घनशाम कंचम हा तरु ण ठाणे जिल्हा सामान्य रु ग्णालयात उपचार घेत असल्याचे सांगितले. त्या पोलिसांनी गावातील सरपंचाच्या मदतीने या नावाची व्यक्ती येथे राहत असल्याबाबत चौकशी केली. त्यात घनश्याम हा काका संजू राठोड यांच्यासमवेत राहत असल्याचे समोर आले. त्यानंतर त्याची ओळख पटवून त्याला नातेवाईकांसह स्वगृही पाठवण्यात आले.>अनोळखी म्हणून उपचारार्थ दाखल झाल्यावर त्याच्यावर वेळीच उपचार झाले.त्यानंतर तो हरवल्याचे समोर आल्यावर तो स्वगृही गेलाहे विशेषच आहे. त्यातच रुग्णाची सेवा करून त्याला अशाप्रकारे घरी पाठविण्यात रु ग्णालयातील सामाजिक कार्यकर्त्यांसह कर्मचाऱ्यांनी घेतलेली मेहनत ही विशेषच आहे.- डॉ.केम्पी पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा सामान्य रु ग्णालय