शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात जिथे शक्य तिथेच युती - दानवे

By admin | Updated: January 24, 2017 04:16 IST

राज्यात महापालिका, जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी जिथे शक्य होईल तिथे युती करण्यात येईल, असे भाजपाचे

पुणे : राज्यात महापालिका, जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी जिथे शक्य होईल तिथे युती करण्यात येईल, असे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सोमवारी स्पष्ट केले. भाजपाला शिवसेनेशी युती करायची असेल तर पूर्ण राज्यात करावी लागेल अशी शिवसेनेकडून मांडण्यात आलेली भूमिका दानवे यांनी स्पष्ट शब्दांत फेटाळून लावली. त्याचबरोबर युतीबाबत बोलताना वाट कुणी कुणाची पाहत नाही, वाट पाहण्यात फसवेगिरी होते, असेही त्यांनी सांगितले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व रावसाहेब दानवे यांनी सोमवारी शहरातील सर्व खासदार, आमदार व पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यानंतर दानवे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.दानवे म्हणाले, राज्यातील १० महापालिका, जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांमध्ये शिवसेनेसोबत युती करण्याचे अधिकार आम्ही स्थानिक पातळीवर दिले आहेत. त्यानुसार त्या त्या ठिकाणी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांशी बोलणी सुरू आहे. जिथे युती होईल तिथे एकत्र लढून युती न झाल्यास स्वबळावर लढू. पुण्यामध्ये युतीची चर्चा सुरू आहे, कुठेही युतीचे गाडे अडलेले नाही. योग्यवेळी युतीचा निर्णय जाहीर केला जाईल असे दानवे यांनी स्पष्ट केले. मुंबईमध्ये आम्ही शिवसेनेकडे ११४ जागा मागितल्या आहेत, त्यानुसार त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद येण्याची आम्ही वाट पाहत आहोत. दोन्ही बाजूच्या काही कार्यकर्त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला, मात्र यामुळे युतीमध्ये अडसर निर्माण व्हायला नको अशी अपेक्षा दानवे यांनी व्यक्त केली.अनेक ठिकाणी गुंडांना पक्षात प्रवेश दिला जात असल्याने पक्षाची प्रतिमा मलिन होत असल्याबाबत दानवे यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी सांगितले, ‘‘आम्ही कुठल्याही गुंडाला पक्षात प्रवेश दिला नाही. इतर कार्यकर्त्यांसोबत काहीजण येऊन पक्षाचा शेला घालून घेत असतील तर त्याला पक्षप्रवेश म्हणता येणार नाही. कुठल्याही गुंडाला पद व तिकिट दिले जाणार नाही.’’पुणे महापालिकेच्या निवडणुकीचा सविस्तर आढावा प्रदेशाध्यक्ष व मुख्यमंत्र्यांनी यावेळी घेतला. प्रत्येक आमदार व पदाधिकाऱ्याचे निवडणुकीच्या तयारीविषयी मत या वेळी ऐकून घेण्यात आले. (प्रतिनिधी)