शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
2
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
3
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
4
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
5
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
6
Latest Marathi News LIVE: होर्मुझ सामुद्रधुनीचा पेच, तणाव वाढला; ४० देशांची होणार बैठक, ब्रिटन-फ्रान्सने घेतला पुढाकार
7
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
8
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
9
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
10
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
11
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
12
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
13
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
14
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
15
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
16
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
17
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
18
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
19
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
20
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

कुरुंदवाडमध्ये उद्यापासून राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा

By admin | Updated: May 1, 2015 00:31 IST

येथील तबक उद्यानातील कै. दिनकर सातपुते क्रीडानगरीत कै. आर. के. पाटील रौप्यचषक स्पर्धेसाठी राज्यभरातून पुरुष व महिला गटातील सुमारे ६० संघ सहभागी होणार

कुरुंदवाड : येथील साधना मंडळ व राष्ट्र सेवा दल यांच्या संयुक्त विद्यमाने, तसेच राज्य व जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या सहकार्याने २ ते ५ मे अखेर राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा होत आहेत. येथील तबक उद्यानातील कै. दिनकर सातपुते क्रीडानगरीत कै. आर. के. पाटील रौप्यचषक स्पर्धेसाठी राज्यभरातून पुरुष व महिला गटातील सुमारे ६० संघ सहभागी होणार आहेत. या स्पर्धेची संपूर्ण तयारी झाल्याची माहिती साधना मंडळाचे अध्यक्ष जयपाल बलवान व आब्बास पाथरवट यांनी पत्रकार बैठकीत दिली.ते म्हणाले, या मंडळाचा क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय काम करणारी संस्था म्हणून लौकिक आहे. आजपर्यंत या स्पर्धा भरविल्या जात असून, या वर्षीची ही ३६ वी स्पर्धा आहे. ६५ किलो गट पुरुष, ३५ किलो गटाखालील पुुरुष व महिला खुला गट, अशा एकूण तीन गटांत स्पर्धा होणार आहे. कै. दिनकरराव सातपुते क्रीडानगरीत प्रकाशझोतात या स्पर्धा पार पडणार असून, स्पर्धेसाठी मुंबई, मुंबई उपनगर, पुणे, अहमदनगर, ठाणे, नाशिक, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, रत्नागिरी, सांगली, सातारा अशा १२ जिल्ह्यांतील पुरुष व महिला गटातील निमंत्रित ४८ संघ सहभागी होणार आहेत.या स्पर्धेची संपूर्ण तयारी झाली असून, उद्या, शनिवारी सायंकाळी नगराध्यक्ष संजय खोत व उपनगराध्यक्ष वैभव उगळे यांच्या अध्यक्षतेखाली उद्घाटन होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी एस. जी. सुभेदार, भूपाल दिवटे, महावीर पोमाजे, वैभव उगळे, बाबासो सावगावे, रमेश भुजूगडे उपस्थित होते.