शहरं
Join us  
Trending Stories
1
Revanth Reddy : "राहुल गांधी पंतप्रधान असते तर त्यांनी PoK परत आणला असता"; रेवंत रेड्डी यांचा मोदींवर निशाणा
2
काय सांगता..! २,६५२ लाडक्या बहिणी निघाल्या सरकारी कर्मचारी, शासन करणार वसुली
3
आजचे राशीभविष्य: शुक्रवार 30 मे 2025; शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, नोकरी-व्यवसायात उत्साहित होऊन कामे कराल
4
लोन मिळवून देण्याच्या नावावर सर्वाधिक लोकांना लागलाय चुना, गमावलेत ₹३३,१४८ कोटी
5
"अकाऊंट हॅक झालेलं तर गप्प का बसलात?" सुदेश म्हशिलकरांच्या स्पष्टीकरणानंतर प्राचीचा सवाल, म्हणाली...
6
पाक करणार होता हल्ला; पण भारताच्या ब्रह्मोसमुळे फसला, पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची कबुली
7
महापालिकेच्या निवडणुका सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये, महायुती म्हणून एकत्र लढणार : चंद्रशेखर बावनकुळे
8
पाकिस्तानी हेराचा हनी ट्रॅप; अभियंत्याला ठाण्यात अटक, डॉकयार्डमध्ये होता अभियंता
9
थकला-भागला 'विक्रम'; हमीभाव ठरविण्याची एकूण प्रक्रियाच संशयाच्या भोवऱ्यात
10
जोर ओसरतोय, पेरणीची घाई नको, ५ ते ६ दिवस पावसाची तीव्रता कमी असेल
11
IPL 2025 : रजतच्या नेतृत्वाखाली RCB संघाला 'सुवर्ण' संधी! पंजाबला शह देत थेट फायनलमध्ये एन्ट्री
12
ईडीच्या उपसंचालकांना लाच घेतल्याप्रकरणी सीबीआयने ताब्यात घेतले; नेमकं प्रकरण काय?
13
युद्धविराममध्ये कधीही व्यापाराचा उल्लेख नव्हता; भारताने ट्रम्प यांच्या टॅरिफ दाव्यांना पुन्हा एकदा नाकारले
14
वैष्णवी तर गेलीच आहे, आता वाईट बोलू नका; वडिल अनिल कस्पटेंच्या भावनांचा बांध फुटला
15
Vinayak Chaturthi 2025: सद्गुरू वामनराव पै सिद्धीविनायकाकडे काय मागावं हे सांगताहेत!
16
RCB vs PBKS : कोहलीचं सेलिब्रेशन बघून अनुष्का शर्माला आलं हसू; तो व्हिडिओ होतोय व्हायरल
17
धारावीत निम्मी जागा सार्वजनिक वापरासाठी; उर्वरित जागेत पुनर्वसन, नूतनीकरणाचे होणार काम
18
'डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली महिलेची १ कोटी ८१ लाखांची फसवणूक; गुन्हे शाखेच्या कारवाईत टोळीचा पर्दाफाश
19
Covid-19 च्या डेल्टा व्हेरिएंटमुळे सायलेंट हॉर्ट अटॅक वाढले, आयआयटी इंदूरच्या अहवालात खुलासा

अकोल्यात राज्यस्तरीय जॉइंट अँग्रोस्को

By admin | Updated: May 28, 2016 02:12 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज होणार उद्घाटन, केंद्रीय मंत्री राजीव प्रताप रूडी, कृषिमंत्री खडसे यांचीही उपस्थिती.

अकोला: गत वर्षभरात कृषी विद्यापीठांनी व कृषी, शासकीय विभागांनी केलेल्या विविध विषयांतील संलग्न संशोधनांना व शिफारशींना मान्यता देण्यासाठी संयुक्त कृषी संशोधन आणि विकास समितीची सभा २८ ते ३0 मे दरम्यान डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात होत आहे. या सभेला उद्घाटक म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तर प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय सांसदीय कामकाजमंत्री राजीव प्रताप रू डी, राज्यातील कृषी विद्यापीठांचे प्रतिकुलपती एकनाथराव खडसे अकोल्यात येणार असल्याची माहिती डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रविप्रकाश दाणी यांनी शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. या सभेत कृषी संशोधकांनी केलेले संशोधन, शिफारशींवर शिक्कामोर्तब केले जाणार आहे.बदलत्या जागतिक हवामानबदलाच्या पृष्ठभूमीवर राज्यातील शेती शाश्‍वत आणि शेतकरी समृद्ध होण्यासाठी शेतीव्यवसायाला अधिक फायदेशीर आणि बळकट करणे ही काळाची गरज ओळखूनच राज्यातील कृषी विद्यापीठांनी आपल्या संशोधनाच्या दिशा निश्‍चित केल्या आहेत. उपलब्ध संसाधनांवर आधारित अल्प खर्चाचे एकात्मिक अन्नद्रव्य, पीक संरक्षण तंत्रज्ञान, कृषिमालाचे मूल्यवर्धन, जल व मृद् संधारण यांसह शेतीपूरक व्यवसायातील नवनवीन संधींचा फायदा येणार्‍या काळात बळीराजाला नवी उमेद देणारा ठरेल. या दिशेने राज्यातील चारही कृषी विद्यापीठे वाटचाल करीत आहेत. त्यासाठी कृषी विद्यापीठांच्या संयुक्त कृषी संशोधन व विकास समितीची सभा यावर्षी अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात आयोजित केली असून, २८ मे रोजी सकाळी १0 वाजता या सभेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्घाटन करतील. अध्यक्षस्थानी कृषिमंत्री एकनाथराव खडसे राहतील.