शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

दहीहंडीचा क्रीडा प्रकारात समावेश करण्यासाठी राज्य सरकारची समिती

By admin | Updated: February 15, 2015 00:54 IST

उत्सवाचा साहसी क्रीडा प्रकारात समावेश करण्यासाठी राज्य सरकारने मुंबई भाजपाचे अध्यक्ष व आमदार अ‍ॅड़ आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली ११ सदस्यीय समिती स्थापन केली आहे़

नारायण जाधव - ठाणेमहाराष्ट्राची संस्कृती जोपासणारा दहीहंडी उत्सव सातासमुद्रापार पोहोचला आहे़ न्यायालयीन निर्देशांचे पालन करून दहीहंडी उत्सवाचा साहसी क्रीडा प्रकारात समावेश करण्यासाठी राज्य सरकारने मुंबई भाजपाचे अध्यक्ष व आमदार अ‍ॅड़ आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली ११ सदस्यीय समिती स्थापन केली आहे़ समितीत राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्यासह दहीहंडी संघटनांचे तज्ज्ञ आणि क्रीडा व विधी खात्याच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे़ तीन महिन्यांत अहवाल सादर करावयाचा आहे़ढाकूमाकूमच्या तालावर मुंबई, ठाणे, पुण्यासह राज्यभर साजऱ्या होणाऱ्या दहीहंडीचा डौलच काही औरच असतो़ या उत्सवातील थरांचे आकर्षण स्पेनसारख्या युरोपातील देशांपर्यंत पोहोचले आहे़ मात्र, गेल्या एक-दोन वर्षांत सराव करताना आणि प्रत्यक्षात हंडी फोडताना अपघात होऊन अनेक गोविंदा जायबंदी झाले आहेत. काहींना जीव गमवावा लागला आहे़ यामुळे आठ ते नऊ थरांची मर्यादा, बालगोविंदांचा त्यात समावेश करू नये, असे अनेक निर्बंध न्यायालयाने घातले़ या निर्बंधामुळे दहीहंडी उत्सवातील तो ‘थरार’ जाऊन त्याचा आनंद घेता येत नसल्याचे सांगून मुंबई-ठाण्यातील लोकप्रतिनिधींनी दहीहंडीचा साहसी क्रीडा प्रकारात समावेश करण्याची मागणी विधिमंडळाच्या अधिवेशनात केली होती़ त्यानुसार, क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी दहीहंडीचा साहसी क्रीडा प्रकारात समावेश करण्यासाठी समिती स्थापन करण्याचे आश्वासन दिले होते़ त्यानुसार, ही समिती स्थापन करण्यात आली आहे़समितीची कार्यकक्षादहीहंडी उत्सवाचा समावेश साहसी क्रीडा प्रकारात करण्याच्या दृष्टीने स्पर्धेच्या आयोजनाची पद्धत, या उत्सवासंदर्भात उच्च व सर्वोच्च न्यायालयांत दाखल जनहित याचिकांच्या अनुषंगाने न्यायालयाने दिलेल्या आदेशाचा अभ्यास करून करावयाच्या उपाययोजना, साहसी क्रीडा प्रकाराचे नियम, दहीहंडी उत्सवात सहभागी होणाऱ्या क्रीडापटू अर्थात गोविंदांना द्यावयाच्या सोयीसुविधा यांचा विचार करून नियमावली तयार करून ती शासनास सादर करायची आहे़