शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

संजय दत्तच्या सुटकेबाबत स्पष्टीकरण देण्यास राज्य सरकारला दोन आठवड्यांची मुदतवाढ

By admin | Updated: July 4, 2017 05:43 IST

बॉलीवूड अभिनेता व १९९३ साखळी बॉम्बस्फोटातील दोषी संजय दत्त याची शिक्षा पूर्ण होण्यापूर्वीच का सुटका करण्यात आली, याचे

लोकमत न्यूज नेवटर्कमुंबई : बॉलीवूड अभिनेता व १९९३ साखळी बॉम्बस्फोटातील दोषी संजय दत्त याची शिक्षा पूर्ण होण्यापूर्वीच का सुटका करण्यात आली, याचे स्पष्टीकरण देण्यासाठी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला सोमवारी दोन आठवड्यांची मुदत दिली. उच्च न्यायालयाने यासंदर्भात राज्य सरकारला दोन आठवड्यांत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. बेकायदेशीररीत्या शस्त्रास्त्रे बाळगल्याप्रकरणी संजय दत्तला पाच वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली होती. खटल्यादरम्यान संजय दत्त जामिनावर होता. सर्वोच्च न्यायालयाने त्याच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब केल्यावर त्याने मे २०१३ मध्ये टाडा न्यायालयासमोर शरणागती पत्करली होती. न्यायालयातून त्याची रवानगी थेट येरवडा कारागृहात करण्यात आली होती. त्यानंतर त्याची सुटका फेब्रुवारी २०१६ मध्ये झाली. शिक्षेला आठ महिने पूर्ण होण्यापूर्वीच राज्य सरकारने संजय दत्तला त्याच्या चांगल्या वर्तणुकीची सबब पुढे करत त्याची कारागृहातून सुटका केली.गेल्या सुनावणीत न्या. आर.एम. सावंत व न्या. साधना जाधव यांच्या खंडपीठाने दत्तची कोणत्या आधारावर लवकर सुटका करण्यात आली, याचे उत्तर सरकारला देण्यास सांगितले होते. त्यावर सोमवारच्या सुनावणीत सरकारी वकील प्राजक्ता शिंदे यांनी महाअधिवक्ता या प्रकरणात सरकारची बाजू मांडत असून ते अन्य एका सुनावणीत व्यस्त असल्याचे सांगत सुनावणी दोन आठवडे तहकूब करण्याची विनंती न्यायालयाला केली.न्यायालयाने त्यांची विनंती मान्य करत संजय दत्तच्या सुटकेबाबत स्पष्टीकरण देण्यासाठी राज्य सरकारला दोन आठवड्यांची मुदतवाढ दिली.संजय दत्त कारागृहात असताना त्याची पॅरोल व फर्लोवर वारंवार सुटका होत होती. याविरुद्ध संजय भालेकर यांनी उच्च न्यायालयात ही जनहित याचिका दाखल केली आहे.