शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात मध्यरात्री २ तास गावगुंडांचा धुमाकूळ; रिक्षा, कार, स्कूल बससह २० ते २५ वाहनांची तोडफोड
2
ज्या मराठी तरुणीला मारहाण झाली, तिची परिस्थिती गंभीर; डॉक्टर म्हणाले, पॅरालिसीस...'
3
दुबईत नोकरी, १० लाखाची ऑफर...; मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी १९ वर्षांनी मोहम्मद शेखची सुटका
4
पाकिस्तानी विमानांना भारतीय हवाई हद्दीत प्रवेश नाहीच; केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय
5
जो पोलिसांना सापडला नाही, त्याला मनसेच्या कार्यकर्त्यांना कसा शोधला?; समोर आली थरारक घटना
6
पाच फुटांच्या मूर्तींचे कृत्रिम तलावांतच विसर्जन करा, पर्यावरण विभागाची सूचना!
7
गुरुवारी गुरुपुष्यामृत योग: १० राशींवर अपार धनलक्ष्मी कृपा, पगारवाढ लाभ, स्वामी शुभच करतील!
8
तनिष्कने उघडले चमचमणाऱ्या हिऱ्यांच्या नव्या युगाचे दारः पारदर्शकतेला मिळालं नवं तेज!
9
उपराष्ट्रपतीपदासाठी राजनाथ सिंह यांचे नाव? राष्ट्रपतींनी स्वीकारला धनखड यांचा राजीनामा
10
आजचे राशीभविष्य २३ जुलै २०२५ : या राशींना आजचा दिवस लाभदायी, या राशींसाठी...
11
केवळ १८ महिन्यांचा संसार, मागितली १२ कोटींची पोटगी, बीएमडब्ल्यू! कोर्ट महिलेला म्हणाले... 
12
महिलांना लग्नाच्या जाळ्यात ओढून उकळायचा पैसे; मंदिरात लग्न उरकायचा अन्...
13
‘उडत्या’ मिनेल्ले फारुकीची पाकिस्तानात चर्चा; ठरली देशातील सर्वात युवा पायलट!
14
७/११ बॉम्बस्फोटाच्या निकालाविराेधात सरकार सुप्रीम कोर्टात; गुरुवारी सुनावणी
15
३०० बंधारे आणि छोटी धरणे काढली, चीनची ‘यांगत्सी’ जिवंत झाली, आपण ‘मुळा-मुठेला’ कोंडून मारणार?
16
भोंग्याबाबतचे नियम दुसऱ्यांदा मोडल्यास गुन्हा नोंदवा! राज्याच्या पोलिस महासंचालकांचे आदेश
17
नवे उपराष्ट्रपती निवडताना भाजपला नाही चिंता; ४२२ सदस्यांचे समर्थन; बहुमताने एकच उमेदवार
18
आम्ही तुमची अर्थव्यवस्था चिरडून टाकू; रशियन तेल खरेदीमुळे अमेरिकेचा भारताला इशारा
19
अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार; शिक्षिकेला मिळाला जामीन
20
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा वादात; म्हणे ‘शासनच भिकारी’

राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी

By admin | Updated: April 8, 2017 05:09 IST

आजपर्यंत विधिमंडळात अनेक संघर्षाचे प्रसंग घडले मात्र विरोधी पक्षाने कधीही राष्ट्रगीतावर बहिष्कार घातला नव्हता.

मुंबई : आजपर्यंत विधिमंडळात अनेक संघर्षाचे प्रसंग घडले मात्र विरोधी पक्षाने कधीही राष्ट्रगीतावर बहिष्कार घातला नव्हता. आज कामकाज संस्थगित होताना विरोधी पक्षाने राष्ट्रगीतावरही बहिष्कार घातला. निवडणुकांत सातत्याने झालेल्या पराभवांमुळे विरोधी पक्ष खचून गेला आहे. म्हणूनच त्यांनी ही बहिष्काराची पळवाट शोधून काढली, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत विरोधकांचा समाचार घेतला. विरोधी पक्षाने खरे तर कामकाजात सहभाग घेऊन चर्चा करायला हवी होती, असेही ते म्हणाले. राज्याच्या अर्थसंकल्पात शेती क्षेत्रासाठी सर्वाधिक भांडवली गुंतवणूक करण्यात आली आहे. शेतकऱ्याला ८ हजार कोटी रूपयांची थेट मदत करण्यात आली आहे. कर्जात बुडालेल्या शेतकऱ्याला निश्चित दिलासा देण्यात येणार आहे. त्याचसोबत जे १ कोटी शेतकरी नियमित कर्ज भरत आहेत, त्यांनाही मदत करण्यात येईल. राज्य सरकार शेतकऱ्याच्या पाठिशी भक्कमपणे उभे राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.विकासनिधीचे समान वाटप झाले पाहिजे, ही आपली भूमिका आहे. शिवसेनेच्या आमदारांनाही समान निधी वाटप करण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. प्रामाणिक पत्रकाराला संरक्षण मिळावे, ही आपली भूमिका आहे. त्यासाठीच पत्रकार हल्लाविरोधी विधेयक संमत करण्यात आले आहे. मात्र एका बाजूला प्रामाणिक पत्रकाराला संरक्षण देताना कायद्याचा दुरूपयोग होऊ नये, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)>खडसे नाराज नाहीतमाजी महसूलमंत्री एकनाथ खडसे हे स्वपक्षाच्या मंत्र्यांवरच टीका करत असल्याचा प्रश्न केला असता, एकनाथ खडसे हे अजिबात नाराज नाहीत. लोकप्रतिनिधीला जेव्हा जनतेच्या एखाद्या प्रश्नाबाबत सात्विक संताप निर्माण होतो, तेव्हा तो व्यक्त होतो, असेही मुख्यमंत्री म्हणाले.सेनेचा आरोप हास्यास्पदनिवडणुकांमध्ये भाजपाने ५० हजार कोटी रुपये वापरले, हा शिवसेना खा. संजय राऊत यांचा आरोप हास्यास्पद आहे. संजय राऊत यांच्या आरोपांना आपण फार महत्त्व देत नसल्याचेही त्यांनी सांगितले.