शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
2
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
3
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
4
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
7
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
8
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
9
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
10
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
11
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
12
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
13
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
14
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
15
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
IPL 2026: कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
17
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
18
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
19
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
20
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

‘अटल बंधन’बाबत प्रदेश भाजपा अंधारात

By admin | Updated: August 17, 2016 04:09 IST

शिवसेनेच्या ‘शिवबंधन’ला आव्हान देत, मुंबईत भाजपाने हाती घेतलेल्या ‘अटल बंधन’ या कार्यक्रमाबाबत प्रदेश भाजपा पूर्णत: अंधारात असल्याचे आज स्पष्ट झाले

मुंबई : शिवसेनेच्या ‘शिवबंधन’ला आव्हान देत, मुंबईत भाजपाने हाती घेतलेल्या ‘अटल बंधन’ या कार्यक्रमाबाबत प्रदेश भाजपा पूर्णत: अंधारात असल्याचे आज स्पष्ट झाले. या कार्यक्रमाची आपल्याला कुठलीही कल्पना नव्हती, या शब्दांत प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी आज पत्रकारांशी बोलताना नाराजी व्यक्त केली. अटल बंधन हा भाजपाचा अधिकृत कार्यक्रम नसल्याचे दानवे यांनी सांगितले. मुंबई भाजपा ही एक व्यवस्थेचा भाग आहे. तेथील अध्यक्षांची नियुक्ती हे प्रदेशाध्यक्षच करीत असतात, या शब्दात दानवे यांनी मुंबई भाजपा अध्यक्ष आ. आशिष शेलार यांना आपली जागा दाखवून दिली. भाजपामध्ये उपरे असलेले प्रसाद लाड यांच्या संकल्पनेतून आणि मुंबई भाजपाचे अध्यक्ष आ. शेलार यांच्या पुढाकाराने ‘अटल बंधन’ मनगटावर बांधून घेण्याचा कार्यक्रम सुरू झाला आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वातंत्र दिनी केले होते. भाजपाचा हा अधिकृत कार्यक्रम नसल्याचेच दानवे यांनी एक प्रकारे स्पष्ट केले. राज्यात इतरत्र कोठेही ‘अटल बंधन’चे कार्यक्रम होणार नाहीत. दानवे म्हणाले की, ‘केंद्र सरकारची दोन वर्षांची कामगिरी सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रदेश भाजपाने ठिकठिकाणी ‘विकास पर्व’चे कार्यक्रम घेतले. आता सर्वपक्षीय अशी तिरंगा यात्रा काढली जात आहे. प्रशिक्षण शिबिरे सुरू आहेत. स्वतंत्र विदर्भ राज्याबाबत आपण विधिमंडळ अधिवेशनादरम्यान केलेल्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला. विदर्भाबाबत, तसेच अखंड महाराष्ट्राबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडली, तीच आपली भूमिका आहे,’ असे दानवे म्हणाले. (विशेष प्रतिनिधी)