शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
5
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
6
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
7
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
8
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
9
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
10
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
11
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
12
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
13
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
14
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
15
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
16
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
17
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
18
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
19
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

राज्य बँकेच्या कर्जाची शासनाने अखेर घेतली हमी !

By admin | Updated: August 11, 2015 22:37 IST

परिपत्रक काढले; पण पैसे अद्याप मिळाले नाही.

अकोला : विदर्भातील शेतकर्‍यांना अल्पमुदती पीक कर्ज उपलब्ध करू न देण्यासाठी राज्य शासनाने अखेर राज्य सहकारी बँकेच्या ४६७ कोटी रुपये कर्जाची हमी घेतली असून, यासंबंधीचे परिपत्रक काढण्यात आले आहे; परंतु राज्य सहकारी बँकेकडून अद्याप पैसे मिळाले नसल्याने जिल्हा सहकारी बँकांचे कर्ज वसुलीनंतरच कर्ज देण्याचे धोरण कायम आहे. गतवर्षी दुष्काळ पडल्याने पन्नास टक्कय़ांपेक्षा कमी आणेवारी आलेल्या राज्यातील २३ हजार ८११ गावांतील शेतकर्‍यांची आर्थिक परिस्थिती वाईट आहे. या शेतकर्‍यांना अल्पमुदती पीक कर्जाचा बोजा कमी करण्यासाठी शासनाने पीक कर्जाचे पुनर्गठन केले आहे. पाच वर्षांपर्यंत शेतकर्‍यांना या पीक कर्जाची परतफेड करायची आहे; या खरीप हंगामात शेतकर्‍यांना पीक पेरणीसाठी कर्ज हवे; पण मागील वर्षाचे कर्ज फेडल्याशिवाय नवे कर्ज देण्यास राज्यातील जिल्हा बँका राजी नसल्याने शेतकर्‍यांची आर्थिक कोंडी झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर शेतकर्‍यांना पीक कर्ज मिळावे याकरिता एक महिन्यानंतर राज्य सहकारी बँकेच्या कर्ज परतफेडीची हमी राज्य शासनाने घेतली आणि स्वत: ४६७ कोटी रुपये राज्य सहकारी बँकेला मंजूर केले आहेत. दरम्यान, शेतकर्‍यांना नवीन पीक कर्ज उपलब्ध करू न देण्यासाठी रू पांतरित कर्जाच्या साठ टक्के इतकी रक्कम नाफेडकडून राज्य सहकारी बँकेच्या माध्यमातून जिल्हा सहकारी बँकेला दिली जाते. राज्य शासनाने या कर्जाची हमी घेतल्यास नाबार्डकडून फेरकर्ज स्वरू पात राज्य बँकेला हे कर्ज मंजूर केले जाते.राज्य शासनाने पीक कर्जाच्या पुर्नगठनानंतर शेतकर्‍यांनी कर्ज न फेडता नवीन पीक कर्ज उपलब्ध करू न देण्याची घोषणा केली होती. या घोषणेला एक महिना झाला असून, विदर्भातील चार जिल्हय़ातील शेतकर्‍यांना कर्ज मिळावे यासाठी राज्य सहकारी बँकेची हमी घेतली आहे. त्यानुसार राज्य सरकारच्या हिश्श्य़ाचे १५ टक्के म्हणजे ७६ कोटी रक्कम मंजूर केली आहे. यातील ६६ कोटी ८ लाख रुपये विदर्भातील अकोला, यवतमाळ, अमरावती व चंद्रपूर जिल्हा सहकारी बँकेला मंजूर झाले आहेत. यात अकोला जिल्हा बँकेला ३८ कोटी ६0 लाख मंजूर करयात आले आहेत.

*रक्कम मिळालीच नाही

         शासनाने राज्य सहकारी बँकेच्या कर्जाची हमी घेतली असली तरी अद्याप जिल्हा सहकारी बँकेला ही रक्कम मिळाली नाही. त्यामुळे २0१४-१५ चे पीक कर्ज व त्यावर १२ टक्केप्रमाणे शेतकर्‍यांकडून व्याज आकारले जात आहे.

*कर्जाचे पुनर्गठन केले; पण चालू खरीप हंगामाचे

        शासनाने मागील खरीप हंगामापासून पीक कर्जांचे पुनर्गठण केले आहे; तथापि परिपत्रक चालू खरीप हंगामातील पीक कर्जाचे काढल्याने शेतकरी द्विधा मन:स्थितीत असून, जिल्हा सहकारी बँका मात्र शेतकर्‍यांकडून मागील वर्षाचे कर्ज आणि व्याज वसूल करीत आहेत.