शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

कर्जत-कल्याण मार्गावर खड्डे भरण्यास सुरुवात

By admin | Updated: January 19, 2017 03:28 IST

कर्जत-कल्याण राज्य मार्गावर गेल्या दोन महिन्यांत पाच अपघात घडले आहेत.

नेरळ : कर्जत-कल्याण राज्य मार्गावर गेल्या दोन महिन्यांत पाच अपघात घडले आहेत. या संदर्भात डिकसळ ग्रामस्थांनी अनेक वेळा बांधकाम विभागाच्या निदर्शनास आणूनही बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले होते. या संदर्भात ‘लोकमत’ ने १७ जानेवारी रोजी ‘कर्जत-कल्याण राज्यमार्गावर अपघातात वाढ’ अशी बातमी प्रसिद्ध केली होती. याची दखल घेत बांधकाम विभागाने या रस्त्यावर डांबराने खड्डे भरण्याचे काम सुरू केले आहे. कर्जत तालुक्यातील कर्जत -कल्याण राज्यमार्गावरील डिकसळजवळील एका हॉटेलजवळ असलेला गतिरोधक आणि खोल खड्डा यामुळे येथे पाच अपघात घडले आहेत. गेल्या दोन महिन्यांत येथे दोन चारचाकी आणि दोन दुचाकीला अपघात घडला असून अनेक जण जखमी झाले. असे असताना अनेक वेळा बांधकाम विभागाकडे ग्रामस्थांनी तक्रार केली. परंतु या जागेची पाहणी देखील करण्यास बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना वेळ मिळाला नव्हता. या रस्त्यावर चार महिन्यांत अनेकवेळा खड्डे भरले परंतु काही दिवसातच या रस्त्यांची अवस्था पुन्हा खड्डेमय होते. त्यामुळे या रस्त्यावर प्रवासी व वाहन चालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. दोन दिवसांपूर्वी याच ररस्त्यावरील कर्जत रेल्वे पुलावर दोन दुचाकीमध्ये अपघात घडला असून एक तरु ण मृत पावला आहे. असे अनेक अपघात घडत असताना बांधकाम विभागाचे अधिकारी मात्र बेफिकीर असल्याचे येथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे. अपघातानंतर अशा अधिकाऱ्यांनाच जबाबदार धरण्यात यावे, अशी मागणी ते करत आहेत. तसेच याच कर्जत - कल्याण मार्गावर अनेक ठिकाणी धोकादायक खड्डे पाहायला मिळत आहेत. याच रस्त्यावर नेरळ जिते गावाजवळ पावसाळ्यात दरड कोसळल्याने दगडे रस्त्याच्या कडेला आले आहेत, त्यांचीही पाहणी करून ते लवकर उचलण्यात यावेत व त्या भागात डांबराने खड्डे भरावे, अशी मागणी देखील वाहनचालकांकडून होत आहे.>कर्जत-कल्याण राज्य मार्गावर पाच अपघात घडल्यानंतर बांधकाम विभागाला जाग आली आहे. त्यानंतर या मार्गावर बांधकाम विभागाने डांबराने खड्डे भरण्याचे काम सुरू केले आहे. परंतु हे खड्डे चांगल्या दर्जाचे भरावेत. जर हे खड्डे लगेचच उखडले तर रास्ता रोको करून आंदोलन करण्यात येईल. - किशोर गायकवाड,स्थानिक ग्रामस्थ, डिकसळ