शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

अभियांत्रिकी प्रवेशप्रक्रियेला सुरुवात

By admin | Updated: June 2, 2016 20:57 IST

राज्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या प्रथम वर्ष ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून गुरुवारपासून या प्रक्रियेला सुरुवात झाली. राज्यभरातील शासकीय

ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 2 -  राज्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या प्रथम वर्ष ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून गुरुवारपासून या प्रक्रियेला सुरुवात झाली. राज्यभरातील शासकीय व सरकारी महाविद्यालयांची प्रवेशप्रक्रिया ‘कॅप’ मार्फत राबवली जाईल. मोठ्या प्रमाणावर रिक्त राहणाºया जागा भरण्याचे मोठे आव्हान यंदा महाविद्यालयांसमोर आहे. अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख १६ जून ही आहे. नागपूर विभागातील ५८ अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये अभियांत्रिकी प्रथम वर्षाच्या एकूण २५,२९२ जागा आहेत. 
‘जेईई-मेन्स’ आणि बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर अभियांत्रिकी प्रवेशप्रक्रियेचे वेळापत्रक व प्रवेशप्रक्रियेबद्दल विद्यार्थ्यांकडून सातत्याने विचारणा होत होती. अखेर तंत्रशिक्षण संचालनालयाकडून प्रवेशप्रक्रियेसंदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली. यंदादेखील केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया ही ऑनलाईन असेल.  तंत्रशिक्षण संचालनालयाने स्थापित केलेल्या निरनिराळ्या ‘एआरसी’तून (अप्लिकेशन अ‍ॅन्ड रिसिप्ट सेंटर) विद्यार्थी आपले अर्ज भरू शकतात.  एआरसीमध्ये आपला अर्ज दाखल करतानाच विद्यार्थी आपली प्रमाणपत्रे पडताळून घेऊ शकतात. 
 
प्रवेशाअगोदर विद्यार्थ्यांना करावी लागणार नोंदणी
प्रवेशप्रक्रियेअगोदर विद्यार्थ्यांना ‘आॅनलाईन’ नोंदणी करावी लागणार आहे. ‘डीटीई’च्या नव्या नियमांनुसार यंदा विद्यार्थ्यांना आवडत्या महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी भरपूर वेळ मिळणार आहे. याअगोदर ‘सीईटी’त चांगले गुण मिळाल्यानंतरदेखील विद्यार्थ्यांना आवडते महाविद्यालय किंवा शाखा मिळत नव्हती. पहिल्या फेरीत जे महाविद्यालय मिळाले आहे, तेथेच प्रवेश घ्यावा लागत होता. आता ‘कॅप’च्या पहिल्या फेरीदरम्यान विद्यार्थ्यांना १०० महाविद्यालयांचा विकल्प द्यावा लागणार आहे. जर विद्यार्थ्यांना आवडते महाविद्यालय मिळाले नाही, तर ते दुसºया फेरीसाठी पात्र ठरतील. त्यातदेखील आवडते महाविद्यालय मिळाले नाही तर त्यांना तिसºया फेरीत सहभागी होण्याची संधी मिळेल. चौथ्या फेरीत त्यांना महाविद्यालयांचे विकल्प बदलण्याची संधी मिळेल. प्रक्रियेदरम्यान जागेसंदर्भातील आपली भूमिका विद्यार्थ्यांना ‘फ्रीझ’, ‘स्लाईड’, ‘फ्लोट’ या विकल्पांतून सांगता येणार आहे.
 
काय आहे ‘फ्रीझ‘, ‘स्लाईड’, ‘फ्लोट’?
फ्रीझ: उमेदवाराने मिळालेली जागा स्वीकारली असून त्याला पुढील फेºयांमध्ये सहभागी व्हायचे नाही. हे विकल्प निवडणारे उमेदवार पुढील फेºयांसाठी पात्र राहणार नाहीत.
स्लाईड: उमेदवाराने मिळालेली जागा स्वीकारली आहे. परंतु जर त्याच शैक्षणिक संस्थेत चांगल्या अभ्यासक्रमातील जागा मिळाली तर ती स्वीकारण्याची तयारी आहे. हा विकल्प निवडणारे उमेदवार पुढील फेरीसाठी पात्र राहतील.
फ्लोट : उमेदवाराने मिळालेली जागा स्वीकारली आहे. परंतु चांगल्या महाविद्यालयात जागा मिळाली तर ती स्वीकारण्याची तयारी आहे. जागा नाही मिळाली तर याच जागेवर प्रवेश घेण्याची तयारी. हा विकल्प निवडणारे उमेदवार पुढील फेरीसाठी पात्र राहतील.
 
आवश्यक कागदपत्रे...
- बारावीची गुणपत्रिका
- शाळा सोडल्याचा दाखला
- जात प्रमाणपत्र
- नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र
- जात वैधता प्रमाणपत्र
- अधिवास प्रमाणपत्र
 
वेळापत्रक
ऑनलाईन अर्ज दाखल करणे       २ जून ते १६ जून
कागदपत्रांची पडताळणी       २ जून-१७ जून
तात्पुरती गुणवत्ता यादी१९ जून
अंतिम गुणवत्ता यादी        २२ जून
‘कॅप’च्या पहिल्या फेरीसाठी ‘ऑप्शन फॉर्म’२२ जून ते २५ जून
तात्पुरती वाटप यादी (पहिली फेरी)२७ जून
‘कॅप’च्या दुसºया फेरीसाठी ‘रिपोर्टिंग२८ जून ते ५ जुलै
तात्पुरती वाटप यादी (दुसरी फेरी)७ जुलै
‘कॅप’च्या तिसºया फेरीसाठी ‘रिपोर्टिंग८ जुलै ते १२ जुलै
तात्पुरती वाटप यादी (तिसरी फेरी)१४ जुलै
‘कॅप’च्या चौथ्या फेरीसाठी ‘रिपोर्टिंग१५ जुलै ते १८ जुलै
रिक्त जागा (चौथी फेरी)२० जुलै
‘कॅप’च्या चौथ्या फेरीसाठी ‘ऑप्शन फॉर्म’२१ जुलै ते २४ जुलै
तात्पुरती वाटप यादी (चौथी फेरी)२६ जुलै
वर्गांना सुरुवात        १ आॅगस्ट