शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
4
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
5
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
6
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
7
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
8
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
9
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
10
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
11
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
12
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
13
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
14
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
15
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
16
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
17
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
18
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
19
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
20
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
Daily Top 2Weekly Top 5

शेलवडच्या बालाजी उत्सवाला सुरूवात

By admin | Updated: October 13, 2016 20:02 IST

कला आणि कलावंत यांची भूमी असलेल्या जिल्ह्यातील बोदवड तालुक्यातील शेलवड येथे अडीचशे वर्षाची मोठी परंपरा व इतिहास असलेल्या बालाजी देवस्थानच्या ब्राह्मोत्सवाला

ऑनलाइन लोकमत

बोदवड, दि. 13 -  कला आणि कलावंत यांची भूमी असलेल्या जिल्ह्यातील बोदवड तालुक्यातील शेलवड येथे अडीचशे वर्षाची मोठी परंपरा व इतिहास असलेल्या बालाजी देवस्थानच्या ब्राह्मोत्सवाला दसऱ्याच्या पालखी उत्सवापासून सुरूवात झाली. ११ दिवस चालणाऱ्या या उत्सवात ११ रोजी व्यकंटेश पती ‘बालाजी उत्सव मूर्ती’ला पालखीतून गाव प्रदक्षणा घालून सुरूवात करण्यात आली. १२, १३ रोजी भजन, कीर्तन, आरतीचे आयोजन तर १४,१५,१६,१७ या चार दिवसात विष्णूचा मत्स अवतार, रामायन , नृसिंह अवतार नाटीका सादर करण्यात येणार आहे. बालाजी उत्सवाला सुमारे अडीचशे वर्षांची परंपरा आहे. मंदिराचे विश्वस्त रमणसिंग पाटील यांची सातवी पिढी या उत्सवाची परंपरा जपत आहे. मोघल काळातील केशरसिंग पाटील, पांडुरंग पाटील, मोहनसिंग पाटील, त्र्यंबकसिंग पाटील व आता रमणसिंग पाटील ही मौर्य घराण्याची सातवी पिढी हा वारसा जपत आहे. बालाजी उत्सवाप्रमाणेच नाटक प्रयोगाची उज्ज्वल दीडशे वर्षाची परंपरा ही संस्था जपत आली आहे. आजच्या डिजिटल युगात ही नाटकाच्या प्रयोगाला प्रेक्षकाची भरभरून दाद मिळत असल्यानेच उत्साह कायम असल्याचे संस्थानचे अध्यक्ष रमणसिंग पाटील यांनी सांगितले. त्यांच्या या उपक्रमाला संपूर्ण शेलवड गाव व संस्थेचे सेवाधारी संचालक कडू गावडे, गणेश कुलकर्णी, गोविंदा कापसे यांचे सहकार्य लाभत आहे. संस्था ही १९५३ साली नोंदणीकृत आहे. स्वत:चे नाट्यगृह असलेले जिल्ह्यातील एकमेव संस्थान आहे. या संस्थेची अडीचशे वर्षा पूर्वीची उत्सव मूर्ती व १५ वर्षा पूर्वीची पाषाण मूर्ती आहे. तालुक्यातील हे एकमेव बालाजी मंदीर आहे.