शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

तारांकित हॉटेल उद्योगाचे ब्रँड इंडिया!

By admin | Updated: September 20, 2016 05:07 IST

देशातील एकूण एक ते पंच तारांकित हॉटेलमध्ये या घडीला सुमारे १ लाख २० हजार खोल्यांची क्षमता आहे.

मुंबई : देशातील एकूण एक ते पंच तारांकित हॉटेलमध्ये या घडीला सुमारे १ लाख २० हजार खोल्यांची क्षमता आहे. मात्र पुढील चार वर्षांत त्यात १ लाख ८० हजार नव्या अतिरिक्त खोल्यांची भर घालण्यासाठी हॉटेल उद्योगाने ‘ब्रँड इंडिया’ची हाक दिली आहे. या घोषणेअंतर्गंत २०२० सालापर्यंत देशात येणाऱ्या १ कोटी पर्यटकांसाठी एकूण ३ लाख खोल्या उपलब्ध असतील.या उपक्रमामध्ये शासनाने पायाभूत सुविधा उभारून हातभार लावावा, असे आवाहन फेडरेशन आॅफ हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन्स आॅफ इंडिया (एफएचआरएआय) या हॉटेल जगतातील शिखर संघटनेने केले आहे. एफएचआरएआयचे अध्यक्ष भरत मलकानी यांनी सांगितले की, मध्य प्रदेशातील इंदूर येथे २२ ते २४ सप्टेंबरदरम्यान ‘ब्रँड इंडिया’ संकल्पनेवर कन्व्हेन्शन पार पडेल. यामध्ये मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान, केंद्रीय पर्यटन आणि सांस्कृतिक राज्यमंत्री डॉ. महेश शर्मा, लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन, नीती आयोगाचे अध्यक्ष अमिताभ कांत यांची प्रमुख उपस्थिती असेल. याशिवाय देशातील ५००हून अधिक हॉटेल व्यावसायिकांचे मालक भाग घेतील. पायाभूत सुविधा वाढवण्यासाठी सरकारी प्रयत्न वाढवून उत्पादने आणि सेवांमध्ये ब्रँड इंडिया वाढवण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जाईल, असेही मलकानी यांनी सांगितले.ब्रँड इंडियामार्फत पर्यटन अधिकारी, योजनाकर्ते, गुंतवणूकदार यांना एकाच मंचावर विचारविनिमयासाठी आमंत्रित केले आहे. ही घोषणा पूर्ण करण्यासाठी हॉटेल जगताने ब्रँड इंडियांतर्गत २ लाख कोटी उभारण्याचा संकल्प केला आहे. इंदोरमध्ये पार पडणाऱ्या या ब्रँड इंडियाच्या कन्व्हेन्शनमध्ये हॉटेल उद्योगासाठी आर्थिक उभारणी, तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अधिक महसूल निर्माण करणे, मोबाइल वॉलेट्स तंत्रज्ञानाच्या वापराने डिजिटल मार्केटिंग, सजावटींतील नवीन ट्रेंड्स यांचा समावेश असेल. कन्व्हेन्शनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ५ टीज म्हणजेच टॅलेंट, ट्रॅडिशन, टुरिझम, ट्रेड आणि टेक्नॉलॉजी यांवर भर दिला जाणार आहे. (प्रतिनिधी)>ब्रँड इंडियाचा फायदा काय? ब्रँड इंडियाच्या माध्यमातून देशातील अ‍ॅडव्हेंचर, वेलनेस, स्पोटर््स, इको टुरिझम, फिल्म, ग्रामीण आणि धार्मिक तसेच अन्य उत्पादनांचा प्रसार केला जाईल.शेकडो व्यावसायिकांना एकाच व्यासपीठावर एकत्र येण्याची संधी मिळेल.या माध्यमातून देशातील कानाकोपऱ्यात हॉटेल उद्योगाचे जाळे विणले जाईल. शिवाय लाखो तरुणांना रोजगार उपलब्ध होईल.मोठ्या संख्येने विदेशी पर्यटक देशात आकर्षित झाल्याने कोट्यवधी रुपयांचे परकीय चलनही मिळेल.