शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

विकासासाठी जमीन दिल्यास मुद्रांक शुल्कात सवलत

By admin | Updated: May 15, 2014 02:30 IST

एखाद्या व्यक्तीने फ्लॅट स्कीमसाठी आपली जमीन बिल्डरला दिली तर त्याच जागेवर त्या व्यक्तीला जे फ्लॅट मिळतील, त्यावर तिला प्रचलित दराने मुद्रांक शुल्क भरावे लागणार नाही.

मुंबई : एखाद्या व्यक्तीने फ्लॅट स्कीमसाठी आपली जमीन बिल्डरला दिली तर त्याच जागेवर त्या व्यक्तीला जे फ्लॅट मिळतील, त्यावर तिला प्रचलित दराने मुद्रांक शुल्क भरावे लागणार नाही. बर्‍याचदा आपल्या मालकीची जमीन बिल्डरला विकासासाठी दिली जाते. त्यासाठी करार केला जातो. या करारानुसार बरेचदा मूळ जमीन मालकाला बिल्डर घरे किंवा फ्लॅट देतो. या घरावर इतर घर मालकांप्रमाणे मूळ जमीन मालकालादेखील मुद्रांक शुल्क भरावे लागत होते. प्रभा लक्ष्मण घाटे विरुद्ध राज्य शासन या प्रकरणात उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार आता मूळ मालकांना आपल्या जमिनीवर विकसित झालेल्या घरांपैकी त्यांना मिळालेल्या घरांसाठी इतरांप्रमाणे मुद्रांक शुल्क द्यावे लागणार नाही, असा आदेश महसूल विभागाने गेल्या आठवड्यात काढला. मूळ जमीन मालक आणि बिल्डर यांच्यात जेव्हा जमीन विकासासाठीचा करार होतो तेव्हा बिल्डरने ५.५० टक्के मुद्रांक शुल्क भरलेले असते. त्यामुळे त्याच जागेवर विकसित झालेल्या घरांपैकी जी घरे मूळ जमीन मालकाला दिली जातील त्यावर मुद्रांक शुल्क इतरांप्रमाणे लावू नये, असा युक्तिवाद याचिकाकर्त्याने केला होता आणि उच्च न्यायालयाने तो मान्य केला होता. प्रभा लक्ष्मण घाटे यांच्या प्रमाणेच असलेल्या इतर प्रकरणांमध्ये न्याय लावावा. केवळ महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमानच्या कलम ४ नुसार मुद्रांक शुल्क आकारावे, असे महसूल विभागाच्या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. या कलमातील तरतुदीनुसार केवळ २० रुपयांच्या मुद्रांकावर व्यवहार होतील. (विशेष प्रतिनिधी)