शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

संमेलनात स्टॉलधारक आक्रमक

By admin | Updated: February 8, 2015 23:32 IST

नाट्यनगरीच्या आवारात स्टॉलची व्यवस्थित मांडणी नाही, नियोजित कार्यक्रमांची ठिकाणे बदलल्याने स्टॉलकडे कुणी फिरकले नसल्यामुळे विक्रेत्यांनी पैसे परत मागितले.

प्रकाश बेळगोजी, बेळगाव, बाळासाहेब ठाकरे नाट्यनगरीनाट्यनगरीच्या आवारात स्टॉलची व्यवस्थित मांडणी नाही, नियोजित कार्यक्रमांची ठिकाणे बदलल्याने स्टॉलकडे कुणी फिरकले नसल्यामुळे विक्रेत्यांनी पैसे परत मागितले. स्टॉलधारकांनी आक्रमक पवित्रा घेतल्याने काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. ‘स्टॉलवर जाऊन खरेदी करा, खा-प्या’ असे आवाहन करण्याची वेळ नाट्य परिषदेच्या अध्यक्षांवर आली. नाट्य नगरीच्या आवारात ७५ स्टॉल आहेत. खाद्य पदार्थांबरोबरच कपडे, खेळणी आदींचे स्टॉल आहेत. या विक्रेत्यांकडून तीन दिवसांसाठी ५ हजार रुपये भाडे घेतले आहे. बेळगाव तसेच बाहेरगावाहूनही लोकांचे स्टॉल्स् आहेत.शुक्रवार-शनिवारी विक्रेत्यांकडील वस्तूंची विशेष विक्री झालीच नाही. पण रविवार असल्याने आणि सकाळपासून कार्यक्रम असल्याने विक्री जास्त होईल, या अपेक्षेने खाद्य पदार्थ विक्रेत्यांनी जास्त प्रमाणात तयार करुन ठेवले होते. संयोजकांनी मुख्य सभागृहातील कार्यक्रम अचानक दुसऱ्या सभागृहात घेण्याचे जाहीर केले. त्यानुसार उपस्थित प्रेक्षक दुसऱ्या स्थळी निघून गेले. दोन दिवसांपासून प्रेक्षक न फिरकल्याने आणि आज स्थळ बदल्याने स्टॉलधारकांच्या संतापाचा उद्रेक झाला. सर्व विक्रेत्यांनी एकत्र येऊन नाट्य परिदषेच्या अध्यक्ष वीणा लोकूर यांच्याशी चर्चा करण्याची तसेच स्टॉलचे पैसे परत द्या, अशी मागणी केली. नाट्य परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी याप्रश्नी मध्यस्थी केली. हा वाद मिटावा यासाठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी यांच्यावर, संमेलन नगरीच्या आवारात स्टॉल उभारले, तेथे खाद्य पदार्थांचे स्टॉल आहेत, पुस्तकांची विक्री सवलतीत आहे, असे सांगण्याची नामुष्की आली. (खास प्रतिनिधी)